हरिगांव येथे दत्तजयंती उत्साहात

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडे : दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीचा महोत्सव हरिगाव येथील श्रीदत्त मंदिरामध्ये मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

राजू व सौ.वैष्णवी आव्हाड या नवदांपत्यास पूजेचा मान मिळाला. यावेळी लापशी व कढीभाताचा महाप्रसाद करण्यात आला. उंदिरगाव येथील अस्वले ह्यांनी दरवर्षीप्रमाणे मंदिरास विद्युत रोषणाई मोफत करून दिलीी. यंदाही हा उपक्रम पुढे त्यांनी चालूच ठेवला. या उत्साहात भाटिया कुटुंबांचा नेहमीच मोठा हातभार असतो.

ब्राह्मणगाव व उंदिरगाव येथील भजनी मंडळाने दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचे शोभा वाढवली. महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांना सयोजकांनी धन्यवाद दिले. पौरोहित्य सचिन कोल्हटकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या