राहुरी शहर/अशोक मंडलिक : 24 डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राहुरी न्यायालयात कायदेविषयक शिबिर संपन्न झाले.
त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर मॅडम या होत्या. प्रमुख उपस्थितीत सह.न्यायाधीश माया मथूरे मॅडम या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुरी तालुका बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. मच्छिंद्र देशमुख यांनी केले. राहुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती असावरी वाडकर मॅडम आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, ग्राहकांची जागरूकता काळाची गरज आहे. ऑनलाईन खरेदी करतांना आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. आता ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत दुरुस्ती करण्यात आली. आपली फसवणूक झाली असल्यास आपण कोणत्याही ठिकाणी ग्राहक मंचात नुकसानभरपाई चा दावा करू शकतो असे म्हणून या वर्षातील हे शेवटचे कायदेविषयक शिबिर सर्वांनी उपस्थित राहुन यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ग्राहक संरक्षण कायदया विषयक माहिती ॲड. एम. बी. देशमुख यांनी सांगितली.
कार्यक्रमास ॲड. ज्ञानेश्वर येवले, ॲड. भाऊसाहेब पवार, ॲड.कल्याणी कोल्हे मॅडम, ॲड.तुषार ढवळे, ॲड.अजय पगारे, कोर्ट क्लर्क वैशाली सोनवणे, जया गुप्ता, प्रियंका कुलकर्णी, जावेद शेख, श्रीकांत खेडकर, धोंगडे, दिलीप कुलकर्णी, विकास जाधव आदींसह सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर येवले यांनी मानले.
0 टिप्पण्या