राहुरी / बाळकृष्ण भोसले : तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील महिला सबलीकरण कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना व यिन सकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सात्रळ महाविद्यालयात 'महिला आरोग्य जागर' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रवरा मेडिकल ट्रस्ट अंतर्गत पाथरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. स्वाती विखे यांनी विद्यार्थिनींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी सोदाहरण चर्चा करून मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींशी प्रश्नोत्तररूपी सुसंवाद साधताना तारुण्यातील आरोग्यविषयक विविध समस्यांचे चर्चेतून निराकरण केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दिपक घोलप, प्रा. दिनकर घाणे, डॉ. भाऊसाहेब नवले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहित भडकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला सबलीकरण कक्षाच्या समन्वयक प्रा. लतिका पंडुरे, प्रा. अश्विनी साळुंखे, प्रा. शरयू दिघे, प्रा. दिप्ती आगरकर, सौ. अनिता चोरमुंगे, प्रा. छाया पवार, श्रीमती अलका पावडे यांनी परिश्रम घेतले. आभार श्रीमती शीला गुळवे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. माधुरी जेजुरकर यांनी केले.
0 टिप्पण्या