राहुरी / बाळकृष्ण भोसले : भारत देशाला विकसित करण्या करिता १८ ते ३५ वयोगटाच्या व्यक्तींच्या कार्यक्षमतेची जास्त आवश्यकता आहे. स्टार्टअप मुळे विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. नावीन्यपूर्ण कल्पना, जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी उद्योजक निर्माण करतात स्टार्ट अप करिता शासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या योजना यात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असून विद्यार्थ्यांनी नोकरीच्या कक्षेत न रहाता उद्योजकतेकडे लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन उद्योजक अनिश कुंकुलोळ यांनी केले. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या
राहाता तालुक्यातील कोल्हार येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात सोमवारी वाणिज्य मंडळ, स्टार्ट अप आणि इनोव्हेशन सेलचे उदघाटन झाले. या कार्यक्रमात कुंकुलोळ बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एन.शिंगोटे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य सी. डी. रुद्राक्ष, स्टार्ट अप सेलचे समन्वयक प्रा.ए. के.खर्डे आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात अनिश कुंकुलोळ यांनी विद्यार्थ्यांबरोबर यावेळी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अर्चना विखे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. प्रतिभा कानवडे यांनी मानले.
0 टिप्पण्या