राहुरी / बाळकृष्ण भोसले : “सर्व सामान्यांची वाचन चळवळ वृद्धिंगत होऊन माणूस माणसाशी जोडला जावा तसेच पाथर्डी तालुक्यातील नवसाहित्यिकांनी लिहितं व्हावं त्यासाठी शब्दगंध हे हक्काचं विचारपीठ आहे, त्याला सर्व नवोदितांनी जोडून घ्याव.” असे मत शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य चे सहसचिव शाहीर भारत गाडेकर यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पाथर्डी तालुका शाखेच्या नूतन कार्यकारिणी निवड प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शायर हाजी हुमायून आतार, राजेंद्र उदारे, दिलावर फकीर आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना गाडेकर म्हणाले कि,‘संवादाचे रूपांतर सुसंवादात करण्याची ताकद साहित्यात असते. लेखक लिहिते होतात, गाण्याने माणसे डोलतात. वाचनाने माणसं घडतात म्हणून आपण पुस्तकात असावं. मनसोक्त जगावं आणि प्रेरक व्हावं.पाथर्डीची माती साहित्याने सुगंधित व्हावी”.
यावेळी शब्दगंध सहित्यिक परिषदेच्या पाथर्डी तालुकाध्यक्षपदी डॉ.अनिल पानखडे यांची फेरनिवड करण्यात आली, तर कार्याध्यक्षपदी चंद्रकांत उदागे, सचिव बंडू गाडेकर, सहसचिव भोलेनाथ उर्फ सनी मर्दाने, उपाध्यक्ष श्रीमती ज्योती आधाट-तुपे व प्रा.संतराम साबळे, खजिनदार प्रशांत रोडी, प्रसिद्धी प्रमुख म्हणून विजय शिंदे व बाळासाहेब कोठुळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दिलावर फकीर, भाऊसाहेब गोरे, निलेश गोरे, शशिकांत गायकवाड, सुनिता पालवे, सुनिल पानखडे, संदीप भागवत व निलेश वराडे यांची कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली तर प्राचार्य जी.पी. ढाकणे, प्राचार्य अशोक दौंड, हाजी हुमायून आतार, बंडूशेठ दाणापुरे व राजेंद्र उदारे यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली.
शब्दगंध ची स्थापना पाथर्डीच्या भूमिपुत्रांनी सुरू केलेली असून दिवसेंदिवस बहरत आहे. तालुक्यातील सर्व नवोदित लेखकांना, कवींना, तसेच लोक कलावंताना एकत्र घेऊन साहित्य चळवळ अधिक गतिमान केली जाईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.अनिल पानखडे यांनी सांगितले. या वेळीं भोलेनाथ मर्दाने यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. हाजी हुमायून आतार यांच्या शायरी ने सभासदांची मने जिंकली. अथर्व पानखडे याने लोकं गीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवी चंद्रकांत उदागे यांनी केले व संदीप भागवत यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या