राहुरी : नवनिर्माण सेना आयोजित किल्ला बनवणे स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ हॉटेल चैतन्य देवळाली प्रवरा येथे पार पडला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शाखा राहुरी फॅक्टरी आयोजित महाराष्ट्र दिना निमित्त लॉकडाऊन मध्ये घर तेथे रांगोळी स्पर्धा व दिवाळीचे औचित्य साधुन किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली होती. या रांगोळी स्पर्धेत ४७ तर तालुका स्तरीय किल्ले बनवा स्पर्धेत ४२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचे दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता विजयी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, राहुरी तालुकाध्यक्ष अनिलभैय्या डोळस, जिल्हा उपाध्यक्ष अरुण चव्हाण, तालुका सचिव अनिल गीते, तालुका प्रसिद्धिप्रमुख अमोल पाटोळे, मा. तालुकाध्यक्ष विक्रम गीते, प्रमोद विधाते आदी उपस्थित होते.
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता त्यात रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.दर्शना ताथेड, तसेच दिवाळी निमित्ताने घेण्यात आलेल्या किल्ले बनविणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राहुरी फॅक्टरी येथील वंदे मातरम मंडळ, द्वितीय क्रमांक मावळे ग्रुप राहुरी तर तृतीय क्रमांक युवराज साळुंके राहुरी फॅक्टरी यांनी पटकविला आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश पाटोळे, साहिल पठाण, शुभम गीते, सौरभ निकम, यश सरोदे, गौरव निकम, कृष्णा चवले, राहुल कडू, कुणाल पवार आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या