सरस्वती भुवन प्रशाला बिडकीन येथे राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा


       विलास लाटे/ पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत शालेय पोषण आहार योजना अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र शासनाने सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा करण्याचे ठरविले होते. त्या अनुषंगाने शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या आदेशानुसार मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेत विविध उपक्रम राबविण्यात आले. 

       शाळेच्या परसबागेत शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य, मुख्याध्यापक मधुकर बिरहारे उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ यांच्या हस्ते वेलवर्गीय फळभाज्यांचे बिजारोपण करण्यात आले. त्याचबरोबर पाककृती स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जवळजवळ दिडशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. या स्पर्धेचे उदघाटन प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ, माजी मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी,  ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब सोकटकर, शालेय पोषण आहार विभाग प्रमुख रायभान ठाणगे,  ज्ञानेश्वर चाटुपळे, मंगला गायधने यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण छाया डुबे, जयश्री महाजन यांनी केले. या सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेत रांगोळी स्पर्धा मंगला गायधने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण सुजाता धूत व छाया डुबे यांनी केले.

        विद्यार्थ्यांना संतुलित आहाराचे महत्त्व कळावे म्हणून आरोग्यदायी संतुलित आहाराचे महत्त्व या विषयावर मंगला गायधने यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले, त्याचबरोबर कुपोषण व त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी विज्ञान विभाग प्रमुख मनिषा सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर बिरहारे, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शालेय पोषण आहार विभागाचे ज्ञानेश्वर चाटुपळे यांनी केले. या संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शालेय पोषण आहार विभागाचे रायभान ठाणगे, ज्ञानेश्वर चाटुपळे यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या