किती दिवस शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करायचा- नितीन देशमुख

औरंगाबाद
E.S.I.C. (कर्मचारी राज्य बिमा निगम ) चा जाहीर निषेध अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
अवघ्या राष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा सन 2020 च्या दिनदर्शिकेत एकेरी उल्लेख करून केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या E S I C ने अकलेचे तारे तोडले आहेत,हाच का यांचा छत्रपतींचा आशीर्वाद ?महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधी  या कमेटीवर सदस्य असतांना ही जखमेवर मीठ चोळणारी चूक होतीच कशी, हे महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधी काय मीटिंग ला फक्त चहा बिस्कीट खाण्या साठी जातात का ?आज  ESIC च्या दवाखान्यांमध्ये आमच्या कामगार बंधूंचे काय हाल होतात हे जगजाहीर आहे,दवाखान्याची काय दुरावस्था आहे हे कोणालाही वेगळे सांगायला नको,आणि हे सगळे असताना ,देशाच्या अस्मितेशी ही सरळ सरळ खेळत आहे,आज देशभर या दिनदर्शिकेचे वितरण झालेले असेल याचा जवाब या दिनदर्शिकेच्या निर्मिती मागे असणाऱ्यां झारीतील शुक्राचार्यांना द्यावाच लागेल,म्हणूनच ह्या हारामखोरांवर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली म्हणून गुन्हा दाखल झाला पाहिजे, देशभरातील दिनदर्शिका त्वरित परत बोलावल्या पाहिजे व यांच्या प्रमुखांना तातडीने निलंबित केलंच पाहिजे यासाठी उद्या अखिल भारतीय क्रांतिसेनेनेच्या वतीने E S I C च्या कार्यालयावर सकाळी 11.00 ला जाऊन त्यांना जाब विचारणार आहोत ,त्या दिनदर्शिकेची होळी करणार आहोत व रीतसर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करणार आहोत,अशी माहिती अखिल भारतीय क्रांतीसेना सरचिटणीस नितीन देशमुख यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या