राहुरी : तालुक्यातील कोंढवड तांदुळवाडी येथील मुळा नदीवरील पूलाची दुरूस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग राहुरीचे विभागीय अधिकारी इवळे साहेब यांना क्रांतीसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
कोंढवड तांदुळवाडी येथील मुळा नदीवरील पुलाचे स्टील उघडे पडले आहे.या पुलावरून कोंढवड,शिलेगाव, तांदुळवाडी व आसपासच्या परिसरातील नागरिक, विद्यार्थी ये-जा करत असतात.या उघड्या स्टील मुळे या पुलावर अपघात होण्याची शक्यता असुन या पुलाची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी,अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.पुलाची दुरूस्ती करण्याचे निवेदन देताना अखिल भारतीय क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष नवनाथ ढगे, महेश हिवाळे,किरण म्हसे,भाऊ पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या