क्रांतीसेना मराठवाडा संपर्क प्रमुखपदी पवनकर


हिंगोली : जिल्ह्यातील क्रांतीसेना शेतकरी आघाडीचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष राजीव पवणकर यांची नुकतीच मराठवाडा संपर्क प्रमुख पदी निवड केल्याची माहिती मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले यांनी दिली.
        पवनकर यांनी क्रांती सेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करून गोरगरीब जनतेला दिलासा दिला आहे व हिंगोली जिल्ह्यात क्रांतीसेना संघटन वाढीसाठी भरीव कामगिरी केल्याबद्दल त्यांना संपर्क प्रमुख पदांची जबाबदारी सोपविण्यात आली,असे यावेळी भोसले म्हणाले.या निवडीबद्दल पवनकर यांंचे क्रांतीसेनेच्या संस्थापिका शालिनीताई पाटील, प्रदेश अध्यक्ष संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, कार्याध्यक्ष सुभाष चाटे, संघटक शहाजी कोळपे, मराठवाडा अध्यक्ष शेतकरी आघाडी कृष्णा सावंत, हिंगोली जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव गडदे, जिल्हा संघटक परवेश शिंदे ,औंढा तालुका अध्यक्ष संदीप राठोड व हिंगोली तालुका अध्यक्ष संजय कांबळे आदींनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या