औरंगाबाद : 21 फेब्रुवारी पासून राज्य भर 12 वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.औरंगाबाद विभागाच्या क्षेत्रात ही परीक्षा सुरू झाल्या आहेत.परीक्षा केंद्र देत असताना सदरील शाळेत परिक्षेसाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत की नाही हे ही पाहिले पाहिजे,परंतु रांजणगाव शे.पु.येथील स्व.शंकरराव पाटील विद्यालयातील पहिल्याच इंग्रजी च्या पेपर ला विध्यार्थ्यांना चक्क खाली बसून पेपर सोडवावा लागला.या इतका भोंगळ कारभार काय असू शकतो ?या सगळ्या प्रकरणात संबंधित केंद्र प्रमुखांवर ,कुठलीही चौकशी न करता अर्थपूर्ण हितसंबंध जोपासत सदरील शाळेवर केंद्र मंजूर करणाऱ्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे,अशी मागणी क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. यासाठी आज माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष श्री गोसावी साहेब यांना निवेदन देण्यात आले.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व क्रांती सेनेचे वाळूज महानगर युवा अध्यक्ष औदुंबर देवडकर,शहर जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम पाटील यांनी केले.यावेळी राहुल काळे,यश ठाकूर,गौरव म्हस्के इ. पदाधिकारी उपस्थित होते.


0 टिप्पण्या