ढुस यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् व एरो क्लब ऑफ इंडिया च्या वतीने दिल्लीत सन्मान


नवी दिल्ली

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावचे रहिवासी असलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् तसेच एरो क्लब ऑफ इंडिया च्या वतीने दिल्ली येथे सन्मान करण्यात आला आहे.

पसाक जोलासीड डॅम, लोपबुरी, थायलंड येथे दि. ०५ मे २०१८ रोजी झालेल्या पॅरामोटर या हवेतील साहसी क्रीडा प्रकाराच्या जागतिक स्पर्धेत मर्यादित ०२ किलो इंधनात ३४ किलोमीटर अंतर पार करून राष्ट्रीय विक्रम नोंदविल्या बद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् च्या वतीने मुख्य संपादक तथा इंडिया बुक चे प्रमुख ए. के. चॅटर्जी, रेकॉर्ड मॅनेजमेंट ऑफिसर वंदना भुतानी व वरिस्ट रेकॉर्ड मॅनेजमेंट ऑफिसर विभा भाटिया यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच एरो क्लब ऑफ इंडिया चे अध्यक्ष तथा खासदार मा. श्री राजीव प्रताप रुडी व सेक्रेटरी जनरल मा. अनिशा सुरेश यांच्या हस्ते एरो क्लब ऑफ इंडियाच्या नवी दिल्ली येथिल कार्यालयात आप्पासाहेब ढुस यांना राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.आप्पासाहेब ढुस यांच्या साहसी खेळाच्या कारकिर्दीतील हा पाचवा विक्रम नोंदविला गेला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या