जामखेड : येथील दत्तात्रय काकडे यांची क्रांती सेनेच्या जामखेड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांनी दिले.
क्रांती सेना महाराष्ट्र ही संघटना सामाजिक कार्य करत असुन या संघटनेची स्थापना मा. आ. शालिनीताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अस्तित्वात आलेली आहे. या संघटनेचा महत्वाचा उद्देश अन्याय विरोधात लढा व चळवळ करण्याचे काम केले जाते. आर्थिक दुर्बलांसाठी लढा देणे, आरक्षण गुणवत्तेस मारक असल्याने आर्थिक निकषाचे आरक्षण मिळविणे, कामगार, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य आदी विषयावर पक्ष बांधणी करणे, विभागवार समस्यांवर लढा उभारणे व त्यास न्याय देणे तसेच महाराष्ट्रात तळागळापर्यंत अन्याय विरुद्ध लढण्याचे कामकाज पक्ष संघटनेकडून केले जाते.
या निवडीनंतर क्रांती सेना महाराष्ट्र या पक्ष संघटनेचे अध्यक्ष मा. आ. शालिनीताई पाटील , प्रदेश अध्यक्ष मा. संतोष तांबे, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे सर,शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे, प्रदेश संघटक शहाजी कोळपे, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले, कृष्णा सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश शिंदे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जिल्हा अध्यक्ष जालिंदर शेडगे,द.नगर उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर, कार्याध्यक्ष सुभाष दरेकर,उ.नगर उपाध्यक्ष अजित गुंजाळ, संदीप त्र्यंबके, युवा क्रांती सेना अध्यक्ष शब्बीर शेख, उपाध्यक्ष शेखर पवार आदींनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या