परभणी/प्रतिनिधी : क्रांतीसेना सोनपेठ तालुकाध्यक्ष पदी बाळासाहेब जाधव यांना नियुक्ती पत्र मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले व जिल्हा अध्यक्ष परमेश्वर यादव यांच्या हस्ते देण्यात आले.
सोनपेठ तालुक्यात क्रांतीसेनेचे संघटनात्मक बांधणी करून क्रांती सेनेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविणे व अनेक उपक्रम राबविण्यात येईल असे बाळासाहेब जाधव यांनी सांगितले.
यावेळी परभणी जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर भोसले, गंगाखेड तालुका अध्यक्ष विष्णूदास भोसले, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शुभम गिरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या