अहमदनगर

‘हे मानवा,निर्मिक तू ‘ हे समजून घेतले की जगण्याचा अर्थ कळतो – प्राचार्य टी. ई. शेळके

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : माणूस हा परिस्थितीतून घडतो, माझ्या जीवन वाटेवर चांगली माणसं भेटली, त्यांच्या प्रेमाने, सहकार्यातून जीवनाला अर्थ आणि आकार मिळाला, डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या ‘हे मानवा, निर्मिक तू ‘ हा कवितासंग्रह म्हणजे जगण्याचे सार असून असे जीवन समजून घेतले की जगण्याचा अर्थ कळतो, असे मत ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे प्राचार्य टी. ई. शेळके यांच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्ताने माऊली वृद्धाश्रमात देणगी प्रदान, लोकप्रबोधन व्याख्याने आणि डॉ.बाबुराव उपाध्ये लिखित ‘हे मानवा, निर्मिक तू ‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शन्करराव अनारसे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून औरंगाबाद येथील क्षितिज प्रकाशनचे प्रकाशक पत्रकार, साहित्यिक, चरित्रकार संतोष लेंभे, माजी कामगार तज्ज्ञ संचालक काशिनाथ गोराणे, माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, सुदामराव औताडे, प्रा.शिवाजीराव बारगळ, माजी प्राचार्य के. एस. काळे, सुखदेव सुकळे, सुभाष वाघुंडे हे उपस्थित होते. प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्राचार्य शेळके आणि मान्यवरांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात आले.
डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. उपाध्ये आणि संगीता फासाटे यांनी प्राचार्य शेळके यांचा सत्कार केला. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे प्रसंगफोटोफ्रेम, शाल, बुके, बुके देऊन सत्कार केला. याचप्रमाणे भूमी फाऊंडेशनतर्फे आरोग्यमित्र भीमराज बागुल, काशिनाथ गोराणेबाबा, प्राचार्य के.एस. काळे, सुभाष वाघुंडे यांनी प्राचार्य शेळके यांचे सत्कार केलेे. मान्यवर पाहुण्यांनी मनोगतात सांगितले की, प्राचार्य शेळके हे बिनकाटेरी गुलाब असून त्यांच्या कार्याचा जीवनसुगन्ध मनामनात दरवळतो. असे सांगून त्यांच्या आठवणी सांगितल्या. प्राचार्य अनारसे यांनी प्राचार्य शेळके, कवी डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रकाशक संतोष लेंभे यांचे सत्कार केले. प्राचार्य शेळके यांनी माऊली वृद्धाश्रमासाठी दहा हजारांचा चेक सुभाष वाघुंडे यांना प्रदान केला. वृद्धाश्रमासाठी कार्यरत असणारे शुभम नामेकर यांना संगीता फासाटे यांनी पोशाख दिला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सर्वांना पुस्तके भेट दिली. प्राचार्य शेळके यांनी आपल्या 81व्या वाढदिवसाच्या डॉ. उपाध्ये आपणास पुस्तक अर्पण केले. उपक्रम घडवून आणला त्याबद्दल त्यांनी वाचन संस्कृती प्रतिष्ठानला धन्यवाद दिले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य शन्करराव अनारसे यांनी प्राचार्य शेळके म्हणजे संत आणि सेवाभावाचे प्रतीक असून डॉ उपाध्ये यांनी यावेळी पुस्तक प्रकाशन केले, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुस्तक निर्मिती आणि आशयसार सांगून प्राचार्य शेळके यांचे मोठेपण सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संगीता फासाटे यांना कोपरगाव येथील आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांनी पुस्तकातील प्राचार्य शेळके यांची अर्पणपत्रिका, आशीर्वादपर मनोगत, डॉ. रामकृष्ण जगताप यांचा मलपृष्ठावरील अभिप्राय वाचून दाखवून आभार मानले.

Related Articles

Back to top button