अहमदनगर

हरिगाव येथे ऑक्टोबर महिन्यात तपाचे आयोजन

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : तालुक्यातील हरिगाव मतमाउली भक्तिस्थान येथे ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक शनिवारी भाविकांसाठी तपाचे आयोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिना हा माळेचा महिना असून मतमाउली भक्तगणांची श्रद्धा वृद्धिंगत यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. दि २ ऑक्टोबर रोजी सकाळी मुलांचे वसतिगृह येथे १० वा. नावनोंदणी, १०.४५ वाजता रे फा.जेम्स थोरात यांचे”पवित्र मरिया व तिचे समर्पित जीवन”या विषयावर प्रबोधन होणार आहे.


११-४५ वा.संत तेरेजा चर्च येथे पवित्र मिस्सा बलिदान होईल.१२-४५ वा. पवित्र माळेची भक्ती व नोव्हेना होणार आहे त्याचा लाभ भाविकांनी घ्यावा व ज्यो दिवे, सुनील साळवे, विलास साळवे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button