प्रासंगिक

स्वत:ला घडविण्यासाठीच वेळ खर्च करा- शिवाजीराजे पालवे

शुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान असतो. स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च केल्यास तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. इतराशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.
तुमच्याकडे बघून भूंकणा-या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही. जीवनात एकदा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास घडवीत नसतात. काहीही करा पण गुणवत्तापूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जिव ओता. त्यात सर्वोचस्थानी पोहोचा.
स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला सुरवात केली की, आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते. चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही. जे आजवर तुमच्याकडे काहीच नव्हतं अस काही तुम्हाला हवे आहे मग आजवर जे काहीच केले नाही अस काही तरी करण्याची तयारी ठेवा.
_ शिवाजीराजे पालवे; जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन.

Related Articles

Back to top button