अहमदनगर

स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या घोषणेने प्रहार दिव्यांग संघटनेकडून राहुरीत आनंदोत्सव साजरा

राहुरी – महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची घोषणा झाल्याबद्दल राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या वतीने राहुरी येथील शनि चौकात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. दिव्यांग बांधवांकडून राज्य सरकारच्या या निर्णयाचे लाडू वाटप करुन स्वागत करण्यात आले.
भारतात दिव्यांगांचे स्वतंत्र मंत्रालय असणारे महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. प्रहार दिव्यांग संघटनेची गेली 20 ते 25 वर्षांपासून सतत केलेली मागणी होती. यापूर्वी बरेच आंदोलने केल्याने बच्चुभाऊ कडू यांच्यावर बरेच गुन्हे दाखल झाले. परंतु शिंदे- फडणवीस सरकारने 100 दिवसांत दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय करण्याचा निर्णय घेतला व त्याची घोषणा जागतिक दिव्यांग दिनी 3 डिसेंबर ला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दिव्यांगांचे प्रश्‍न सोडविणारे दिव्यांग हृदयसम्राट माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांचे राहुरी तालुक्यातील दिव्यांग बाांधवांनी विशेष आभार मानले.
राहुरी प्रहार तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी सांगितले की, स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय झाल्यावर प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन व पूनर्वसन केंद्र होणार आहे. त्यामुळे दिव्यांगांचे प्रश्न सुटणार आहे. राहुरी तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी म्हणाले की, राज्यात दिव्यांगांचे प्रश्‍न गंभीर बनले होते. दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. तर दिव्यांगांना सुखी, समाधानाने जीवन जगता येणार असून, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये देखील वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्याक्रमास उपस्थित दिव्यांग बांधवांना व शनी मंदिर परिसरातील भाविकांना मोतीचूर लाडू वाटप करण्यात आले तसेच फटाक्याची आतिषबाजी करत दिव्यांग बांधवांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक म्हाळु पचारणे, तालुका सल्लगार सलीमभाई शेख, तालुका सचिव योगेश लबडे, तालुका समन्व्यक ह.भ.प. नानासाहेब शिंदे, रवींद्र भुजाडी, शाखा अध्यक्ष बाबुराव शिंदे, सारंगधर दरंदले, शाखा अध्यक्ष सुरेश दानवे, शाखा अध्यक्ष दत्ता भाऊ खेमनर, उपाध्यक्ष आदिनाथ महाराज दवणे, शाखा सचिव मुसळे, राहुरी शहर सचिव जुबेर मुसानी, मुस्ताक शेख, मच्छिंद्र जाधव, विष्णू ठोसर, सुखदेव कीर्तने, रवींद्र उगलमूगले, कागले मामा, अरुण पटारे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button