औरंगाबाद

सैतवाल जैन समाजाची घराघरांतून नोंदणी करा – घेवारे

     

विजय चिडे/ पाचोड : सैतवाल जैन समाजाचे गल्ली ते दिल्लीत संघटना वाढीसाठी तळागाळातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून गावागावात सैतवाल जैन समाजाची जनगणनाची नोंदणी करून सभासद नोंदणी करावी असे आवाहन सैतवाल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपराव घेवारे यांनी औरंगाबाद येथील श्री १००८ कालिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदीरात आयोजित केलेल्या एका बैठकीत केले आहे.

सैतवाल जैन समाजाची औरंगाबाद शहर व औरंगाबाद ग्रामीण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता प्रारंभी सैतवाल संस्थेचे महामंत्री मुकुंद वालचाळे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील व औरंगाबाद शहरातील सभासद नोंदणी शिष्यवृत्ती योजना आदींचा आढावा घेतला आहे. यावेळी सैतवाल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपराव घेवारे म्हणाले की सैतवाल जैन समाज हा गरीब समाज असून जैन समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी पैशांची कमतरता असते म्हणून काही सैतवाल जैन समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सैतवाल जैन संस्थेच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करत आहोत. जेणे करून सैतवाल जैन समाजातील विद्यार्थी चांगला शिकला पाहिजे व आय ए एस, आय पी एस झाला पाहिजे. जनगणनेच्या विषयी बोलताना दिलीपराव घेवारे म्हणाले की आपल्या सैतवाल जैन समाजाची लोकसंख्या किती आहे. यासाठी प्रत्येकांनी घराघरातून जनगणना करून घ्यावी जनगणना नोंदणी करण्यासाठी एक लिंक तयार केली असून लिंक ओपन करून त्यात आपली वैयक्तिक माहिती भरावी व जनगणना नोंदणी करावी असे आवाहन केले आहे. आपली सैतवाल जैन संस्था बळकट करण्यासाठी गटतट विसरून सर्वांनी एकाच छत्र छायाखाली येऊन एकत्र काम करावे, असे आवाहन दिलीपराव घेवारे यांनी केले आहे.

यावेळी मुकुंद वालचाळे, विजयकुमार लुंगाडे, विजयकुमार संगवे, शालिनीताई पळसापुरे, पवन अंबुरे, गुलाबचंद बोराळकर, प्रमोद डेरे, निलेश सावळकर, जैन मंदिराचे अध्यक्ष अमोल मोगले, डी डी वायकोस, बाहुबली बोपलकर, विलास जोगी, दिगंबर क्षीरसागर, राहुल जोगी, मीनाक्षी उखळकर, विजया मेहेत्रे, वैशाली धोंगडे, संध्या निंबाळकर, रत्नाकर अन्नदाते, प्रशांत अन्नदाते, भारत देवधरे, महावीर जोगेंद्र, सचिन मडकर आदी औरंगाबाद जिल्ह्यातील व औरंगाबाद शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते महिला मंडळ हजर होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button