अहमदनगर

सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम कोणी करत असेल तर सहन केले जाणार नाही – देवेंद्र लांबे पाटील

राहुरी – तालुक्यातील गुहा येथे आमवस्या असल्याकारणाने मढीला न जाता येथेच कानिफनाथ महाराज यांच्या मंदिरात आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित केला होता. परंतु गावातीलच एका गटाने होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध दर्शविल्याने गुहा गावात कानिफनाथांच्या आरतीवरून धार्मिक व सामाजिक वातावरण तापले होते.
सविस्तर वृत्त असे की, आरती करण्याच्या भूमिकेवर गावातील एका गटाने शांततेत भूमिका घेतली असतांना दुसऱ्या गटाने आक्रमक होत विशिष्ट प्रकारच्या घोषणा देत वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलांना पुढे घालत आरती झाल्यावर वाटण्यासाठी आणलेला प्रसाद मंदिरा पर्यंत आणण्यास मज्जाव केल्याने गुहा गावासह वाड्यावस्तीवर कानिफनाथ महाराज यांच्या आरतीला विरोध झाल्याची बातमी पसरल्याने मोठ्या प्रमाणावर हनुमान मंदिराच्या परिसरात ग्रामस्थ एकत्र येत आरती करणारच या भूमिकेवर ठाम राहिले. होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध दर्शविल्याने गुहा गावात कानिफनाथांच्या आरतीवरून धार्मिक व सामाजिक वातावरण तापले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने होणारा मोठा अनर्थ टळला.
यावेळी बोलतांना देवेंद्र लांबे म्हणाले कि, गेल्या अनेक वर्षांपासून गुहा गावामध्ये कानिफनाथ महाराज यांची यात्रा सर्व ग्रामस्थ एकत्रित रित्या साजरी करत आलेले आहेत. कानिफनाथ महाराज यांची आरती भाविक श्रद्धेने करत असतील तर कुणालाही विरोध करण्याचे काहीएक कारण नाही. अशा प्रकारे कोणी जर गावाला वेठीस धरून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करत असेल तर सहन करून घेतले जाणार नाही असे लांबे पा.म्हणाले.
या प्रसंगी किरण कोळसे, मच्छिंद्र कोळसे, अनिल सौदागर, नंदू सौदागर, ऋषिकेश बांगरे, शशिकांत कोळसे, मच्छिंद्र शिंदे, अशोक उऱ्हे, रामनाथ उऱ्हे, गंगाराम चंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. पोलिस प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात सवांद साधुन गुहा गावाचे वातावरण शांत ठेवण्यासाठी शिवसेनेचे राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी महत्वाची भूमिका बजावली तसेच पोलिस निरीक्षक श्री. डांगे यांनी पोलिस बंदोबस्त देवून गुहा गावाचे वातावरण शांत ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
या प्रसंगी ॲड.सचिन कोळसे, ॲड.प्रसाद कोळसे, राजेंद्र कोळसे, अशोक लांबे, सुजित वाबळे, अविनाश ओहळ, पोपट डौले, दिपक सौदागर, शाम सौदागर, राम बर्डे, रविंद्र उऱ्हे, बाबासाहेब मांजरे, सोमनाथ कोळसे, शिवाजी सौदागर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button