औरंगाबाद

सर्वांनी स्वामींची ‘जगा व जगु द्या’ हि शिकवण अंगिकारावी – चेअरमन घायाळ

पादुका दर्शन सोहळ्यास जनसागर लोटला; अनेक भक्तगणांनी घेतली उपासक दिक्षा
विलास लाटे | पैठण : जगद्गुरु श्रींच्या पादुका दर्शन सोहळ्यात साक्षात स्वामीजी नाथांच्या भेटीला आल्याची प्रचीती येत आहे. हे पैठणकरांचे भाग्य समजतो. एवढा मोठा लाखोंचा भक्तिसागर आज नाथसागराला मिळाला. त्यामुळे आजचा दिवस शुभ व ऐतिहासिक असा आहे. पैठण तालुक्याच्या इतिहासात हा सोन्याचा दिवस आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपण बघतो पैसे देऊन लोक जमवतात तरीपण एवढा जनसमुदाय एकत्र येत नाही. परंतु खरंच स्वामीजींच्या आशिर्वादाने जमलेल्या भक्तगणांची श्रद्धा पाहून आश्चर्य वाटते. स्वामिजींची ‘जगा व जगु द्या’ हि शिकवण सर्वांनी अंगीकारावी असे आवाहन चेअरमन सचिन घायाळ यांनी केले.
स्वामी नरेंद्राचार्य महाराज श्रीक्षेत्र नाणिजधाम प्रणित ‘स्व-स्वरुप’ संप्रदायाच्या वतीने जगद्गुरुश्रींचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम नुकताच औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील संत एकनाथ साखर कारखाना मैदानावर मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, यापुढेही स्वामिजींचे कुठलेही कार्यक्रम असतील तर त्यात आमचाही समावेश करुन घ्यावा. जेणेकरून स्व-स्वरुप संप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळेल अशी विनंती ही त्यांनी केली. कारखान्याच्या इतिहासात एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची ही पहीलीच वेळ होती. यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून भाविक आले होते. यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या सोहळ्यात सुमारे पाच हजार भक्तगणांनी सांप्रदायाची उपासक दिक्षा घेतली. घायाळ यांनी एमआयडीसी मध्ये पार्किंगचे अतिशय सुरेख व शिस्तबद्ध नियोजन केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. एवढा मोठा कार्यक्रम अतिशय शिस्तीत पार पडला. याचा पोलिस यंत्रणेवर जराही ताण येवू दिला नाही. यासाठी दोन हजार स्वयंसेवकांनी महत्वाची भूमिका निभावली. स्वामीजींच्या जिल्हा सेवा संघाचे तसेच याप्रसंगी कारखान्याच्या १४ हजार सभासदांच्या वतीने सर्व भाविकांचं घायाळ यांनी स्वागत केले. या कार्यक्रमात लाखो भाविक उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या दर्शन सोहळ्यात विविध कार्यक्रम व उपक्रम घेण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तालुकाप्रमुख मनोज पेरे यांनी भेट दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री संप्रदाय सेवा समितीचे संदीप थोरात, साहेबराव आहेर, वैष्णव, आप्पासाहेब पठाडे, छाया पांढरे, ठोंबरे व सचिन घायाळ युवा मंचचे अनिल रोडे, बाळु चौधरी, किरण भागवत, गणेश बोंबले, गणेश गिरगे, अशोक जगताप, विष्णु डाके, सोमनाथ रोडे, संतोष गरड, कालु शेख, सुनिल रोडे, निलेश रोडे, भरत पाचोडे, संदीप तवार, मनसुर शेख, राजु चव्हाण, रमेश गायकवाडसह आदी कार्येकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button