अहमदनगर

संस्थेच्या माध्यमातून शेतकरी, सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला – राजेंद्र चेचरे

राहुरी‌ | बाळकृष्ण भोसले – संस्थेच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न सतत आपण केला असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष राजेंद्र चेचरे यांनी व्यक्त केले. राहाता तालुक्यातील लोहगाव विविध कार्यकारी सहकारी ( विकास) सेवा संस्थेची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संपन्न झाली, प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून सभेस सुरुवात करण्यात आली. सभेपुढे येणारे विषयाचे वाचन संस्थेचे सचिव आर. व्ही. चेचरे यांनी केले. यावेळी बोलताना राजेंद्र चेचरे म्हणाले की, सोसायटीच्या कामात आपण कुठलाही राजकीय हस्तक्षेप येऊ दिला नाही. कुणाचे ही काम संस्थेच्या माध्यमातून अडवले नाही. त्यामुळे आज तालुका पातळीवर संस्थेचा नावलौकीक वाढलाा. संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे तालुक्यात एक चांगला संदेश आपल्या संस्थेच्या माध्यमातून गेलेला आहे. ना. राधाकृष्ण विखे , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, युवा नेते खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
यावेळी ॲड बाबासाहेब चेचरे म्हणाले की, सोसायटीचे भाग भांडवल वाढवण्यासाठी सभासदांचे शेअर्स किमान एक लाखापर्यंत करावे सोसायटीचे मालकीचे गाळे बांधून ते भाडे तत्वावर देण्यात यावेत. त्यातून संस्थेच्या भागभांडवलात वाढ होऊन त्याचा फायदा संस्थेच्या सभासदांना लाभांश रूपात देता येईल. संस्थेचे तज्ञ संचालक म्हणून निवड झालेले बाळासाहेब चेचरे व लक्ष्मण चेचरे यांचा प्रसंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र केरुनाथ चेचरे, उपाध्यक्ष विजय हरिभाऊ चेचरे, विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चेचरे, माजी संचालक लहानु चेचरे, ॲड बाबासाहेब चेचरेे, सोसायटीचे माजी चेअरमन भास्करराव चेचरेे, लोहगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच गणेश चेचरेे, पोलीस पाटील वसंतराव चेचरे, प्रगतशील शेतकरी बाबासाहेब भाऊराव चेचरे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरेे, प्रवरानगर जिल्हा बँकेचे शाखाधिकारी लहामगे, किरण चेचरे, भाऊसाहेब सखाहरी चेचरे, अण्णासाहेब नवसाची चेचरे, विनायक दरंदले, अमोल चेचरे, लक्ष्मण चेचरे, प्रवीण चेचरे, दिलीप चेचरे, रावसाहेब मच्छिंद्र चेचरे, संजय नाना चेचरेे, अक्षय चेचरे, सौ अनिता किशोर तुरकणे, सौ पुष्पलता बाबासाहेब चेचरे, अशोक रावसाहेब चेचरे, संस्थेचे तज्ञ संचालक बाळासाहेब चेचरे, लक्ष्मण चेचरे, रविंद्र चेचरे, अण्णासाहेब दामोधर चेचरे, किशोर दरंदले, सुरेश मच्छिंद्र चेचरे, बळीराम चेचरे, कृष्णा चेचरे, अनिल चेचरे, प्रभाकर चेचरे, भाऊसाहेब वाघ, पत्रकार कोडीराम नेहे, संस्थेचे सचिव राजेंद्र वसंतराव चेचरे उपस्थित होते. आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन प्रा. किरण अण्णासाहेब चेचरे यांनी केले.

Related Articles

Back to top button