सामाजिक

संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त दंतरोग तपासणी शिबिर

राहुरी प्रतिनिधी : श्री संत सावता माळी युवक संघ व डॉ. गोरे डेंन्टल क्लीनिक अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या १२६ व्या पुण्यतिथी निमित्त ७ ऑगस्ट रोजी राहुरीतील योगा केंद्र येथे दंतरोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घघाटन नगर विकास ऊर्जा, तंत्रशिक्षण व आदिवासी विकास राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहुरी नगरपालिकेचे अनिल कासार व श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी आप्पा डौले, दंतरोग तज्ञ डॉ.सुदर्शन गोरे, प्रहार दिव्यांग संघटनेचे मधुकर घाडगे, सुनील गुलदगड, संघाचे सल्लागार अजिंक्य मेहेत्रे, मार्गदर्शक जीवन गुलदगड, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख दिपकराव साखरे, जिल्हा अध्यक्ष अशोकराव तुपे,सुनील शिंदे आदीं मान्यवर यावेळी उपस्थितीत राहणार आहेत. 
    सध्या महाग होत चाललेली आरोग्य सेवा ही सामन्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. त्यामुळे व्याधीही वाढत आहेत. त्यामुळे समाजातील डॉक्टर व सामाजिक संघटनांनी सामाजिक बांधिलकी जपून मोफत शिबिराच्या माध्यमातून गरजूवर उपचार करणे आवश्यक झाले आहे. या शिबिराचे आयोजन राहूरी शहराध्यक्ष ऋतिक डागवाले, राहुरी उपाध्यक्ष रितेश सत्रे, राहुरी कार्याध्यक्ष अक्षय गुलदगड, आनंद गोंधळे, ओमकार डागवाले, तेजस राऊत व सर्व पदाधिकारी श्री संत सावता माळी युवक संघ राहुरी शहर व अहमदनगर, मराठा महासंघ अहमदनगर, प्रहार दिव्यांग संघ राहुरी तालुका आदींनी आयोजन केले आहे. तरी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. हा कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करून होणार आहे.

Related Articles

Back to top button