अहमदनगर

श्री संत भगवान बाबा पतसंस्थेची अल्पवधीत झालेली प्रगती नेत्रदीपक-सिताराम भालेकर

राहुरी शहर | अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यात अत्यंत कमी कालावधीत पतसंस्था चळवळीत पारदर्शक कारभार करुन श्री संत भगवान बाबा पतसंस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार आदिवासी विकास विभागाचे सेवानिवृत्त उपआयुक्त सिताराम भालेकर यांनी काढले.
राहुरी तालुक्यातील पतसंस्था चळवळीत अग्रणी समजल्या जाणाऱ्या श्री संत भगवान बाबा पतसंस्थेला आदिवासी विकास विभागाचे सेवानिवृत्त उपआयुक्त सिताराम भालेकर यांनी सदिच्छा भेट दिली या वेळी ते बोलत होते. सहकार चळवळीत काम करताना सभासद, ठेवीदारांचा विश्वास संपादन करुन वसुलीशी निगडीत कर्ज वाटप करुन व्यवहारात पारदर्शीपणा असल्यास पतसंस्थेला प्रगती करण्यास वेळ लागत नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन दिलीपराव आघाव यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी ॲड. प्रदीप मुळे, शिवाजीराव चव्हाण, सौरभ भालेकर, उद्योजक प्रशांत मुसमाडे, आय.एस.ओ. ऑडिटर अनिल येवले, ॲड विवेक तांबे, राजेंद्र उगलमुगले, श्री चोथे, मॅनेजर अजय आघाव तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button