अहमदनगर

शेतकरी प्रश्नांवर कार्यालयांना ठोकणार टाळे- राजेंद्रआबा म्हस्के

श्रीगोंदा/सुभाष दरेकर : तालुक्यातील शेतकर्यांचे अनेक प्रश्न ऐरणीवर असल्याने सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालय येथे दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १२ वा. राजेंद्र आबा म्हस्के यांनी कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, श्रीगोंदा तालुक्यातील डिवाय १२, १३, १४ व त्या वरील उपचार्यांचे भुसंपादन केलेल्या त्या जमीनीचा मोबदला मिळावा, शेतकर्याचे वीजबील माफ करून पुर्ण क्षमतेने व पुर्ण वेळ विज मिळावी, कुकडीचे चालू वर्षी चार आवर्तन मिळालेच पाहिजे, ऊसाची एफ आर पी चे तुकडे न करता एक रक्कमी मिळावी व श्रीगोंदा तालुक्यातील तिन ही साखर कारखान्याने चालू हंगामात किमान २८०० रू भाव द्यावा, लिंपणगावातील अवैध मुरूम ऊचलला त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, राज्य सरकारने शेतकर्याच्या उसाच्या बिलातून कारखान्याकडून विज बिल वसुली करण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले ते रद्द करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
या मागण्यांसाठी राजेंद्र आबा म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र क्रांतीकारी लोकसेवा संघ, श्रीगोंदा तालुका पाटपणी कृती समिती व शेतकरी बांधव यांच्या वतीने हे आंदोलन करणार आहे. तरी या आंदोलनाला शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button