औरंगाबाद

शिवछत्रपती कला महाविद्यालयामध्ये हिंदी दिवस साजरा

 विजय चिडे/ पाचोड : शिवछत्रपती कला महाविद्यालय पाचोड व लोकसेवा कला व विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद एम.यो. यु.अंतर्गत ऑनलाइन हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाँ. दस्तगीर देशमुख यांनी केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आबासाहेब राठोड यांनी आपल्या व्याख्यानात हिंदी भाषेचे महत्व, हिंदी भाषेमध्ये रोजगाराच्या संधी, हिंदी भाषेचा इतिहास याबद्दल सविस्तर विवेचन केले.
दुसरे प्रमुख पाहुणे डॉ. मजीद शेख यांनी दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेने हिंदीच्या प्रचार प्रसारात केलेले योगदान त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी हिंदी भाषेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली याबाबत प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. सुरेश नलावडे यांनी केले, अध्यक्षपद प्रा.डाँ.लियाकत शेख यांनी भूषवले कार्यक्रमासाठी लोकसेवा महाविद्यालय औरंगाबाद व शिवछत्रपती कला महाविद्यालय पाचोड येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक तुकाराम गावंडे यांनी केले, तांत्रिक सहकार्य प्रा.संदीप सातोनकर तर डॉ.उत्तम जाधव यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button