अहमदनगर

शिरसगाव येथे सदगुरु बालसंन्यासी ह.भ.प हरीबाबा पुण्यतिथी सोहळा

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : शासनाने दिनांक ७ ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे खुले करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथे ब्रम्हलीन श्री समर्थ सदगुरू बालसन्यासी श्री ह.भ.प. हरीबाबा यांचा ३२ वा पुण्यतिथी सोहळा कोरोनाचे शासकीय नियम पाळून दिनांक १६ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.


सकाळी ८ वा.शिवलीलामृत गंथ पारायण, सायंकाळी ५ वा. हरिपाठ, रात्री ९ वा हरी कीर्तन, ग्रंथ व्यासपीठ दिनकर यादव व ह.भ.प.मीनाताई महाराज भांड, ह.भ.प.वैशाली बाबासाहेब कदम, ह.भ.प.अंजली बाळासाहेब यादव, दि.१६ ऑक्टोबर-रात्री ९ वा. ह.भ.प.बाळासाहेब महाराज रंजाळे महाराज यांचे हरिकीर्तन, रविवारी १७ ऑक्टोबर- सकाळी समाधी व मूर्तीची विधियुक्त अभिषेक, पूजा, दुपारी ४ वा.मूर्ती व ग्रंथ मिरवणूक, रात्री ९ वा. ह.भ.प.दादासाहेब रंजाळे महाराज यांचे हरिकीर्तन, सोमवार दि.१८ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. महंत श्री रामगिरी महाराज मठाधिपती सरला बेट यांचे सकाळी १० वा. काल्याचे कीर्तन तसेच १९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पोर्णिमा निमित्त संगीत भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेशराव मुद्गुले यांनी व श्री हनुमान मंदिर श्री विठ्ठल मंदिर, श्री महादेव मंदिर ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी शिरसगाव, भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ शिरसगाव वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button