ठळक बातम्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्या मान्य करून न्याय द्या : नितीन देशमुख

कन्नड प्रतिनिधीऔरंगाबाद जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या (सिटू) कन्नड तालुका शाखेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात संघटनेचे जिल्हा सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली घेरावा आंदोलन करून प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
      शालेय पोषण आहार कामगारांना तामिळनाडू राज्याप्रमाणे ११००० रुपये मानधन देण्यात यावे, शालेय पोषण आहार कामगारांना कोविड काळात नियमित मानधन मिळावे, सेंट्रल किचन पद्धत बंद करा, शालेय पोषण आहार कामगारांना शासकीय कुकचा दर्जा द्या, शालेय पोषण आहार कामगारांना किमान वेतन देण्यात यावे, विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण आहार शिजवून द्या, शालेय पोषण आहार कामगारांना सेवा समाप्तीच्या वेळी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान द्या व तीन हजार रुपये पेन्शन लागू करा,अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष रोहिदास सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. यावेळी दिलीप सोनवणे, चंद्रकला सोनवणे, सहिदा बानू पटेल ,तुळशीराम गोरे उषाबाई पवार, शोभाबाई निकम ,सिमाबाई निकम, कुसुम बाई तोडकर,हिराबाई मालोदे, सुनिता कांबळे ,जिजाबाई गोरे, सुंदरबाई गायके ,सुनिता दांडेकर, शेख रहेमान ,शांताबाई सुकलाल, अरुणा पवार, इत्यादी पोषण आहार कामगार उपस्थित होते

Related Articles

Back to top button