ठळक बातम्या

राहुरीत नांदूर रोड लगत एका गाळ्यात सापडले ड्रग्स लिक्वीड व विविध नशेच्या गोळ्या; कोट्यवधींचा मुद्देमाल हस्तगत, तालुक्यात खळबळ

राहुरी | बाळकृष्ण भोसले – राहुरी येथील बारागाव नांदूर रोड लगत शिवचिदंबर सांस्कृतीक मंगल कार्यालयाजवळच असलेले समाधान टी सेंन्टर मागे भांडी दुकानाच्या गाळ्या शेजारील एका दुकान गाळ्यामध्ये कोर्‍याक्स ड्रग्स, विविध प्रकारच्या नशेच्या गोळ्या, उत्तेजित करणार्‍या गोळ्या, झोपेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या अशा अनेक प्रकारच्या नशेच्या गोळ्या व औषधांचा मोठा साठा सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नेमका हा साठा कशासाठी केला गेला याविषयी पोलिस तपास वेगाने फिरत आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, राहुरी येथील बारागाव नांदूर रोड येथील एका गाळ्यामध्ये सुमारे दिड ते दोन कोटी रुपये रकमेचा असलेला हा माल आढळून आला आहे. गुप्त व्यक्तिकडून माहिती मिळताच तातडीने या ठिकाणी पोलिस पथकाने छापा मारून कारवाई करण्यात आली. दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने हा सर्व प्रकार उघडकिस आला आहे.
श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा, महिला पोलिस उप निरीक्षक ज्योती डोके, हवालदार आजिनाथ पाखरे, प्रवीण आहिरे, दादासाहेब रोहकले, रवींद्र कांबळे, नदीम शेख, अशोक शिंदे, विकास साळवे, चालक लक्ष्मण बोडखे, अंमली पदार्थ निरीक्षक ज्ञानेश्वर दरंदले, डी वाय एस पी पथकातले चालक सहाय्यक फौजदार राजेंद्र आरोळे, नितीन शिरसाठ आदि कर्मचारी यांनी ही धडाकेबाज कारवाई केली. नक्की कशासाठी हा साठा केला? व येथून कुठे हा सर्व मालाचा पुरवठा होत होता? आणखी कोण या अवैध धंद्यात सामील आहेत? याचा शोध पोलिस घेत असून तपासाची चक्रे सध्या वेगाने फिरत आहेत.

Related Articles

Back to top button