अहमदनगर

राहुरीतील धानोरे येथे शिवसंपर्क अभियान

राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील धानोरे घाट येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती युवासेना  तालुकाध्यक्ष गणेश खेवरे व तालुका उपप्रमुख कन्हैया दिघे यांनी दिली आहे.
     महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने तालुक्यात धानोरे घाट येथे शुक्रवार दि. ३० जुलै रोजी मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे,  युवासेना जिल्हाप्रमुख विक्रमभैया राठोड व युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश कोतकर, शिवसेना तालुकाप्रमुख विजय ढोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.तरी या शिवसंपर्क अभियानास शिवसैनिक व युवासैनिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन युवासेना तालुकाध्यक्ष गणेश खेवरे व तालुका उपप्रमुख कन्हैया दिघे यांनी केले आहे.

या शिवसंपर्क अभियानात रक्तदान शिबिर, सदस्य नोंदणी, शाखाप्रमुख नियुक्ती व जनतेशी संवाद असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button