मनोरंजन

राहुरीचा नवोदित कलाकार तुफान फेम सौरभ

व्हिडीओ : तुफान मूवी मधील सीन बब्बनचा अभिनयात सौरभ

अहमदनगर प्रतिनिधी : राहुरीचा सौरभ पवारला लहानपणापासूनच नृत्य शैली अवगत असल्यामुळे शालेय जीवनात कला क्षेत्र निवडून त्यामध्ये आयुष्य संपादन करायचं त्यानं ठरवलं.सौरभला अभिनय हा अंगात असल्याचं भासलं ते शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात.तेथूनच अभिनय अंगी उतरू लागला. बारावी उत्तीर्ण होऊन पुण्यात ज्या वेळी पाय ठेवला तसा नाटकाचं शिक्षण घेऊन उच्च शिक्षणाची भर काढून घेऊ असं ठरवलं.बऱ्याच ठिकाणी चौकशी करून गावाच्या मित्रांनी पुणे विद्याीठात असलेल्या ललित कला केंद्राचा पत्ता सांगितला. नाटकाचं पदवीधर शिक्षण असं पहिल्यांदाच ऐकलं आणि तसा त्याठिकाणी भरती प्रक्रिया चा अभ्यास सुरू केला. इच्छेनुसार बीए रंगभूमी ला प्रवेश मिळाला आणि आयुष्याला वळण देणारा टप्पा याठिकाणी पूर्ण झाला. एका नवीन विश्वात,नाटकात सखोल वातावरणात, जगाच्या पातळीवर असलेल्या नाटकांची पुरेपूर ओळख मिळण हे भाग्यच. खरंतर गावाकडून मी मोकळी पाटी घेऊन आलो हेच माझ्यासाठी लाभदायक ठरलं. ती पाटी या तीन वर्षाच्या कालावधीत आत्मविश्वास,सामाजिक व शैक्षणिक ज्ञानाने तसेच स्वअर्थाने भरून निघाली. अभिनय सोबत लिखाण आणि गाणं शिकायला मिळालं आणि अजून कला शैलीत भर पडली. स्वतःला समजून घेणं आणि वास्तविक रहदारीतल्या गोष्टीना वेळोवेळी कसं सामोरं जावं याच धाडस ह्या केंद्रात शिकलो. प्राध्यापक वृंद आणि मित्रपरिवार ह्यांचा सिंहाचा वाटा. व्यवसायातील सभोवतालच्या परिस्थितीला हाताळणं किंवा त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मिळाला अस मी म्हणेन. थोडक्यात स्वतःबद्दल एक नावीन्यपूर्ण व्यक्तिमत्व विकसित होताना दिसत गेलं.

   या नाटकाच्या प्रशिक्षणाचा फायदा सध्या अभिनयाने कार्यरत असलेल्या मालिका,चित्रपटाच्या ठिकाणी अनुभवायला मिळतोय.अनोळखी ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवण हीच ह्या नाटय शिक्षणाची पावती आहे.परिस्थिती कशी ही असू आपण जर आपल्या प्रामाणिक हेतूने आपल्या स्वप्नांना भिडत राहिलो तर नक्कीच त्या स्वप्नांना पंख फुटणार. पुण्यात तीन वर्षांची नाटकात पदवी घेतल्यानंतर पुढं व्यावसायिक दृष्ट्या काम आणि कला सृष्टी बघायला निघालो. राहण्याची सोय ही एक सगळ्यात मोठी गोष्ट असते मुंबई मध्ये आल्यावर. सिनियर मित्रांची अगदीच त्यासाठी मदत झाली. मी आणि माझा मित्र जीव झाला येडा पिसा फेम अशोक फळदेसाई उर्फ शिवा दादा राहू लागलो. एका दादाच्या ओळखीतून मी माझ्या आयुष्यातला मालिकेत(प्रेमा तुझा रंग कसा) स्टार प्रवाह वर पहिलं काम केलं. योगा योग म्हणजे त्यात ‘ बबन ‘(साहेबांचा डावा हात) हे पात्र केलं होत. आणि आयुष्यातल्या पहिल्या चित्रपटात ही ह्याच नावाची भूमिका साकारली. तिथं काम झाल्यानंतर त्याच्या अनुभवावर इतर काही एपिसोड करत गेलो. त्यामधे प्रेमा तुझा रंग कसा(स्टार प्रवाह), क्राईम पेट्रोल दस्तक हिंदी (सोनी टीव्ही) , छोटी मालकीण (कलर्स मराठी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (स्टार प्रवाह ) बाळूमामा च्या नावानं चांगभलं (कलर्स मराठी ) एवढ्या मालिकेत तीन दिवसांचा ट्रॅक मिळाला. ह्या दिवशी मी टीव्हीवर दिसणार त्याच दिवशी कुटुंबात,मित्रपरिवार ह्यांना “मला बघा आज रात्री अमुक तमुक मालिकेत” असा संदेश करायचो. मी काय करतोय हे माझ्या जवळच्या व्यक्तींना सांगणं खूप गरजेचं होतं त्यांचं प्रेम आणि आधार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हे मला माहीत. माझ्यावर विश्वास ठेवणारी माझी आई आणि काही जिवलग मित्र ह्यांना मला टीव्ही वर काम करताना बघून खूप आनंद होतो आणि मला त्यांना आनंदी बघून. 

   मुंबई मध्ये उदरनिर्वाह करन सोप काम नव्हे. अर्ध्या पोटावर दिवसभर ऑडिशन देताना, लांब लांब ठिकाणी प्रवास करताना एकदा तरी हा विचार यायचा की, “जावं गावी आपल्या परत. तिकडं काहीतरी काम करू , हे क्षेत्र आपल्यासाठी नाहीय” वगैरे वगैरे. पण जिद्द वर ह्या क्षेत्रात नाव कमवायचे आहे हेच डोक्यात ठेवून आलेलो इकडे. मग पुन्हा स्वतःला सावरून घ्यावं लागतं. हजाराहून अधिक लोकांना आपली प्रोफाइल पाठवून ठेवल्यामुळे कधी ना कधी लोक आपल्याला कामासाठी बोलवतील ह्याच आशेने दिवस मोजत काढले. ह्याच आशेने एक दिवस नंदिनी श्रीकांत ( कॅस्तींग डायरेक्टर) ह्यांच्या ऑफिस मधून फोन आला आणि दुसऱ्या दिवशी एक ऑडिशन साठी बोलावलं. आनंद झाला की कुणीतरी बोलावलं आपली प्रोफाइल बघून. दुसऱ्याच दिवशी बांद्रा ला त्यांच्या ऑफिस वर गेलो. स्क्रिप्ट देतानाच त्यांनी मला सांगितलं की असा असा सीन आहे तुझा फरहान अख्तर सोबत. त्यावेळी डोक्यात कसलाच विचार नव्हता की हा सीन आपल्याला हिंदी चित्रपट सृष्टीत आपली कला दाखवण्याची संधी देईल. प्रत्येक ऑडिशन ला आंतरिक भीती वाटणं साहजिकच आहे. पण त्या ऑडिशन ला तीन ते चार वेळा रेकॉर्ड केल्यामुळे आत्मविश्वास वाढला. काही दिवसांनी घरी आल्यावर मला त्याच्या कॉल आला की तुमची निवड झाली आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि फरहान अख्तर ह्यांची मुख्य भूमिका असणाऱ्या तुफान ह्या चित्रपटासाठी. त्या ५ मिनिटाच्या कॉल नंतर अस्तिरता निर्माण झाली. माझा आनंद कुणाला सांगू अस होत गेलं. आईला ही आनंदाची बातमी देऊन मुंबई ची वाट धरली आणि त्यांना भेटण्यासाठी पोहोचलो. मानधन त्यांची जर सांगितलं त्यातच होकार देऊन टाकला. १३ दिवसांच शूटिंग आणि ते ही फरहान अख्तर सोबत म्हणजे ह्याची कल्पना देखील होत नव्हती त्या दिवसांत. पण ही गोष्ट जोपर्यंत प्रत्यक्षात घडत नाही तोपर्यंत मी जवळची माणसं सोडता कुणालाच सांगितलं नाही. शूटिंग सुरू झाली आणि राकेश ओम प्रकाश मेहरा ह्यांना बघून स्वप्न सत्यात उतरल्या सारखं वाटलं. मग चित्रपटाचा हिरो समोर आल्यावर छातीचा आकार वाढला आणि पूर्ण आत्मविशवासपूर्वक त्यांच्याशी बोलायला गेलो. वेगळाच रुबाब न कळत अंगात भरला. मेहरा सरांनी सीन झाल्यानंतर पाठीवर शाब्बासकी दिली आणि आयुष्यात खूप काही मोठं घडल्यासारख वाटलं. काही दिवसांनी विजयराज, परेश रावल ,मोहन आगाशे,मृणाल ठाकूर ह्यांच्या संगतीत चहा नाश्ता करण्याचं भाग्य मिळालं. शेजारी बसून बोलण झालं. ते शूटिंग चे सोनेरी दिवस अजून ही आहे डोळ्यात भरून. आयुष्यातला माझा पहिला चित्रपट आणि तेही अश्या ह्या दिग्गज लोकांसोबत स्क्रीन शेयर करायला मिळन म्हणजे नक्कीच नशिबात काहीतरी चांगलं लिहून ठेवलं आहे अस मी म्हणेन. राहुरीच्या मित्रमंडळी, नातेवाईक , अजून वडीलधारी मंडळी ह्यांना नक्कीच मी विश्वास देईल की तुमचं प्रेम आणि आशीर्वादाने एक दिवस त्या चंदेरी दुनियेत आपल्या राहुरीच्या मुलांचं देखील नाव असेल हे तुम्ही गर्वाने इतरांना सांगाल.
 
        ” तुफान चित्रपट १६ जुलै ला अमेझॉन प्राईम ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झाला आहे. नक्की बघा आणि तुमच्या जवळच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना देखील सांगा. मी त्यात “बब्बन” नावाचं पात्र साकारतोय. “
                   सौरभ पवार 
      ( सिने. अभिनेता तुफान मूवी फेम)

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.
Back to top button