अहमदनगर

माथाडी कामगारांना कायद्याचे संरक्षण मिळवून देऊ – ढुस

देवळाली प्रवरा प्रतिनिधी – येथील सर्व माथाडी कामगारांना कायद्याचे संरक्षण मिळवून देऊ असे आज येथील माथाडी कामगारांच्या बैठकीत बोलताना आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.

देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्या उपस्थिती मध्ये आज दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०७:०० वा. देवळाली प्रवरा हद्दीतील सर्व माथाडी कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी देवळाली हेल्प टीमचे आप्पासाहेब ढुस यांची भेट घेऊन बैठक आयोजित केली त्या प्रसंगी ढुस बोलत होते.

या बैठकीस किरण पंडित, विजय कल्हापूरे, चंद्रकांत चव्हाण, सतीश तेलोरे, शरद शिंदे, प्रमोद सांबारे, रमेश म्हसे, अविनाश बर्डे, पांडू भालेकर, नाना भालेकर, अशोक टीक्कल, विलद सरोदे, योगेश जगधने, अरुण सरोदे, नितीन सरोदे, अक्षय सरोदे, संतोष सरोदे, सागर पवार, विकी पटारे, दिलीप सरोदे, पप्पू सरोदे, सुभाष जाधव, फिरोज शेख, विजय जाधव, चंद्रकांत डमाळे, सचिन सोनवणे, शांतवन बनसोडे, लक्ष्मण खरात, रुपेश सरोदे, लखन अस्वले आदींसह ३० असंघटित माथाडी कामगार व देवळाली हेल्प टीमचे सदस्य ऋषीकेश संसारे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी माथाडी कामगारांना मार्गदर्शन करताना आप्पासाहेब ढुस पुढे म्हणाले की, देवळाली प्रवरा हद्दीतील सर्व असंघटित माथाडी कामगारांना त्यांचा भविष्य निर्वाह निधी, ग्राज्युटी, मेडिकल निधी, अपघात नुकसान, दिवाळी बोनस, भरपगारी रजा, रजेचा पगार आणि व्यवस्थापणा साठीचा निधी मिळवून देणेसाठी सर्वप्रथम या ठिकाणी माथाडी कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी येथील सर्व माथाडी कामगारांची अहमदनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाकडे नोंदणी करणेत येईल आणि सर्वांना माथाडी कायद्याचे संरक्षण देणेत येईल.

तसेच आज पासून येथील सर्व माथाडी कामगार हे देवळाली हेल्प टीमचे सदस्य असतील. माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जसा देवळाली हेल्प टीम चा विद्यार्थी सेल नुकताच गठीत झाला आहे त्याच पद्धतीने हेल्प टीम चा माथाडी सेल म्हणून या माथाडी कामगारांच्या पाठीशी देवळाली हेल्प टीम सर्व ताकदीनिशी येथून पुढे उभी राहिल व त्यांना त्यांचे सर्व हक्क मिळवून देणेत येतील असे ढुस यांनी बोलताना शेवटी सांगितले. बैठकीच्या शेवटी किरण भगवान पंडित यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Back to top button