ठळक बातम्या

महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर छावा क्रांतिवीर सेनेचे आमरण उपोषण

राहुरी शहर/अशोक मंडलीक : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मेन गेट समोर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने विद्यापीठ अभियंता व उप अभियंता यांचे विरोधात आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आजचा पहिला दिवस असून त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की विद्यापीठ अभियंता यांनी शासनाची फसवणूक करून नियम बाह्य पद्धतीने विद्यापीठ अभियंता पदि झालेली मिलिंद ढोके यांची नियुक्ती रद्द करून त्याच्या नियुक्तीस जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच मिलिंद ढोके यांनी पदभार स्वीकारल्या पासून आजतागायत केलेल्या सर्व गैर कामांची चौकशी करून त्यांनी कमावलेल्या अवैध संपत्तीची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. 
यासाठी छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याच्या समवेत गणेश येवले, राजाराम शिंदे, बारकु अंभोरे, विलास पाटणी, विठ्ठल भुजाडे, अजय वाबळे, गणेश खडा बेकर, अक्षय गिरी, सागर गोसावी आदी उपोषणास बसले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कोणाचेही उपोषण असो किंवा आंदोलन त्यांचा त्रास सर्व सामान्य नागिराकांना सहन करावा लागत आहे. आज मुख्य गेटवरच सर्वांची विचारपूस करून तुम्हाला कुठे जायचे आहे कोणाकडे जायचे आहे आणि पत्रकारांना तर नेहमीच आडवणूक केली जाते. ते विद्यापीठात फिरतात व विद्यापीठाच्या विरोधात बातम्या लावतात म्हणून पत्रकारांची पण तेथे इन्ट्री करायची व कोणाकडे जायचे आहे. हा सर्व प्रकार बंद कधी होणार आहे? त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी विद्यापीठात येण्यास तयार नाही. विद्यापीठात सध्या एकच नारा चालू आहे फक्त हुकुमशाही ?

Related Articles

Back to top button