अहमदनगर

महात्मा फुले कृषि विद्यापीठात स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम संपन्न

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना संचालनालय व कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ परिसर हरित परिसर कार्यक्रम प्रशासकीय इमारतीसमोर राबविण्यात आला.
याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे, महाराष्ट्र व गोवा विभागीय कार्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक डी. कार्तीकेयन व महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. महाविरसिंग चौहान, मुंबई मंत्रालयातील लेखाधिकारी श्री. खैरनार व लोणी येथील कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर उपस्थित होते.
यावेळी श्री. कार्तीकेयन म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील एकदा वापरुन टाकलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करावा. प्रत्येकाने दररोज कमीत कमी दोन किलो प्लॅस्टिक कचरा गोळा केला तर प्लॅस्टिकच्या कचर्यापासून मुक्ती मिळून परिसर स्वच्छ होण्यास मदत होईल. डॉ. प्रमोद रसाळ यावेळी म्हणाले की आपले मन स्वच्छ ठेवण्यासाठी आपण जसा प्रयत्न करतो तसाच प्रयत्न परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी करायला हवा.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. महाविरसिंग चौहान यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या या स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश स्पष्ट करुन हे अभियान 31 ऑक्टोबर पर्यंत सुरु असणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यापीठाचे क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिसराची साफसफाई केली. यावेळी माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. हरी मोरे, डॉ. कैलास कांबळे, डॉ. पंडित खर्डे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button