अहमदनगर

मफुकृवि आयडॉल्सचा सत्कार उत्साहात संपन्न

राहुरी विद्यापीठ : मफुकृवि आयडॉल्सचा सत्कार समारंभ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे हस्ते महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहात पार पडला. एमपीकेव्ही क्लायमेक्स 2022 कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात हा कार्यक्रम आयोजीत केला गेला.
यावेळी व्यासपीठावर कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. चिंतामणी देवकर, डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, डॉ. गोरक्ष ससाणे, प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे उपस्थित होते.
या समारंभात गतवर्षीचे चार आणि यावर्षीचे चोवीस अशा एकुण अठ्ठावीस मफुकृवि आयडॉल्सचा सत्कार करण्यात आला. यामध्ये स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छाचा समावेश होता. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून प्रत्येक महिन्याला विद्यापीठातून पदवी घेतलेला कृषि उद्योजक आणि एक प्रगतीशील शेतकरी अशा दोन मफुकृवि आयडॉल्सचा कार्यपरिचयाचा फलक विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि विद्यार्थी वसतिगृहाच्या तसेच दहा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रातील कृषि महाविद्यालये, संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये या ठिकाणी प्रदर्शित केला जातो.
कुलगुरु डॉ. पाटील यावेळी म्हणाले की, या उपक्रमामुळे ग्रामीण युवक, विद्यार्थी तसेच शेतकर्यांना या आदर्श मफुकृवि आयडॉल्स पासून प्रेरणा मिळेल आणि त्यांचा आदर्श घेऊन सर्वांना नविन उर्जा मिळेल. ते म्हणाले की कोणत्याही इतर सत्कारापेक्षा ज्या मातीत आपण शिकलो तेथे पुरस्कार मिळाल्याचा वेगळा आनंद असतो. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता चांगले उद्योग स्थापन करुन इतरांसाठी रोजगार निर्माण करावा असे आवाहन त्यांनी केले. सुरुवातीला विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांनी प्रास्ताविक केले. प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे यांनी सर्वांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आयडॉल्सचा कार्यपरिचय करुन दिला. नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे यांनी आभार मानले.
या मफुकृवि आयडॉल्समध्ये प्रामुख्याने सह्याद्री फार्मर्स कंपनीचे संस्थापक इंजि. विलास शिंदे, तसेच यशस्वी कृषि उद्योजक डॉ. स्वप्नील बच्छाव, साहेबराव नवले पाटील, किरण कोठारी, दिलीप देशमुख, पंडित शिकारे, बाबासाहेब भोसले व इतरांचा समावेश आहे. शेतकरी आयडॉल्समध्ये साहेबराव चिकणे, कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, राहुल रसाळ, ज्ञानेश्वर बोडके, डाळिंबरत्न डॉ. बाबासाहेब गोरे, डॉ. संजीव माने, कृषिरत्न रशिद गावित, महादेव जाधव व इतरांचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button