अहमदनगर

बार्टी व समाजकल्याण कार्यालय मार्फत अहमदनगर येथे एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा संपन्न

नगर – अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा ( ॲट्रोसिटी ) अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात साक्षीदाराची भूमिका महत्त्वाची असते तो आपली साक्ष बदलू नये म्हणून शेवटपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच संबंधित प्रशासनाने अपेक्षित पध्दतीने हे प्रकरण हाताळल्यास किंवा प्रक्रिया राबविल्यास निर्दोष सुटण्याचे प्रमाण कमी होईल असे प्रतिपादन निवृत्त जिल्हा न्यायाधीश डाॅ यशवंत चावरे यांनी केले.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 संदर्भात भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अहमदनगर येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेकरिता सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, अहमदनगर राधाकिसन देवढे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश डाॅ. यशवंत चावरे, यशदा मास्टर ट्रेनर सुभाष केकाण, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, आण्णासाहेब जाधव, संजय सातव तसेच बार्टी चे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरूवात महापुरूषांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय अहमदनगर राधाकिसन देवढे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश डाॅ यशवंत चावरे व मास्टर ट्रेनर सुभाष केकाण यांनी कायद्याबाबत विस्तृत अशी माहिती उपस्थितांना दिली. या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी ( महसूल व पोलीस प्रशासन), जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी, साहय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रियंका बोबडे यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार समाजकल्याण कार्यालय निरीक्षक संगीता चितळे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बार्टी समतादूत एजाज पिरजादे, रजत अवसक, संतोष शिंदे, रवी कटके, सुलतान सय्यद, वसंत बढे ,प्रेरणा विधाते, तालुका समन्वयक मारूती जाधव, नारायण आयकर, अनिल क्षीरसागर आदिंनी कामकाज पाहिले.

Related Articles

Back to top button