अहमदनगर

बडे बारा इमाम सवारी उचलण्याचा मान पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके व निसार जहांगीरदार यांना

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : नगर शहरामध्ये मोहरम सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावर्षी मोहरम बडे बारा इमाम सवारी उचलण्याचा मान पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके व निसार जाहंगिरदार यांना देण्यात आला.

   ‌अहमदनगर शहरातील ऐतिहासिक मोहरम सण हे मुस्लिम धर्मीय नवीन वर्ष व मुस्लिम धर्मगुरु हसन व हुसेन यांना मोहरम सणामध्ये सुमारे ४०० ते ५०० सालापूर्वी यहुदी व मुस्लिम धर्मीय मध्ये झालेल्या युद्धामध्ये शहीद झाले असल्याने युद्धांमध्ये वापरण्यात आलेले शस्त्र हे कोठला येथील मशिदीमध्ये असल्याने मोहरम सणांमध्ये ५ व्या तारखेला कोठला इमामवाडा या ठिकाणी हुसेन यांची सवारीची स्थापना करतात व मंगल गेट हवेली या ठिकाणी हसन यांची सवारी स्थापन करतात. मोहरमच्या ९ व्या तारखेला हसन व हुसेन यांची हत्या झाल्याने त्या दिवशी रात्री १२ वा. अहमदनगर शहरातील सुमारे ४० ते ४५ यंग पार्टीचे कार्यकर्ते हे आळीपाळीने खांदा देऊन सवारी उचलून अहमदनगर शहरात मिरवून सुमारे ६ किलोमीटर फिरून छोटे बारा इमाम व बडे बारा ईमाम सवारी कोठला या ठिकाणी पुन्हा बसवितात. त्यानंतर मोहरमच्या १० व्या तारखेला मोहरम विसर्जनाची मिरवणूक निघून यंग पार्टी पुन्हा सवारी खांदा देऊन अहमदनगर शहरात फिरून सुमारे ९ किमी आंतर असून सावेडी बाराव याठिकाणी विसर्जन मोहरम मिरवणुक मोठ्या प्रमाणात निघत असते. तसेच अहमदनगर शहरात मोहरम सणानिमित्त भारतातून भाविक येत असतात. यावेळी सवारी विसर्जन मिरवणूक कोविडमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे याच परिसरामध्ये असलेल्या सवारी ज्या ठिकाणी बसवली त्या ठिकाणी आज सवारी विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली होती. दु. १२:३० वा. जागेवरच सवारीचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाचे नियमांचे पालन करून सर्वांनी सवारीचे दर्शन घेतले.
   ‌‌‌‌‌‌‌‌यावेळी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक गडकरी, पोलिस निरीक्षक न्याहळदे, निशार जाहंगिरदार, फरहान जहागीरदार, राजु जहागीरदार, अमीर जागीरदार, आरिफ मुजावर, शकील मुजावर इत्यादी मुस्लिम बांधव हजर होते.

Related Articles

Back to top button