अहमदनगर

प्रहार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्थेची स्थापना

अहमदनगर प्रतिनिधी : नामदार बच्चू कडू यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पहिली बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था अहमदनगर मध्ये स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी या बहुउद्देशीय संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असुन मुख्य प्रवर्तकपदी बापूराव काणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्व सुविधांपासून वंचित राहिलेल्या तळागाळातील गोरगरीब जनतेला व शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून शेतीशी निगडित असलेल्या सर्व बाबी विशेषतः खते, औषधे, बी-बियाणे व औजारे सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी, दुग्ध व्यवसायाला चालना, आधुनिक शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता करून देण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे काणे यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे हा सुद्धा या संस्था स्थापने मागील मुख्य उद्देश असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य प्रवक्ते संतोष पवार यांनी सांगितले.आज रोजी तोट्यात चाललेली शेती फायदेशीर करण्यासाठी नामदार बच्चू कडुंच्या संकल्पने प्रमाणे आमचा ट्रॅक्टर तुमचे डिझेल या तत्वानुसार शेतकर्‍यांना माफक दरात कच्चा माल देऊन त्यांच्या पिकविलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करणार आहे.एका तालुक्यातून दोन हजार तर जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी करून सभासदत्व देण्याचा मनोदय उपस्थित प्रहार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button