अहमदनगर

प्रहार दिव्यांग संघटनेने दिव्यांगांची दिवाळी केली गोड

राहुरी : येथील गाडगेबाबा आश्रम शाळा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटना तथा दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील दिव्यांगांना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम उंबरे येथील विश्वमाऊली गुरुकुल चे अध्यक्ष ह.भ.प.आदिनाथ दुशिंग यांच्या हस्ते करुन दिवाळी गोड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवा निवृत्त पो.नि. म्हाळु पाचारणे हे होतेे तर ह.भ.प.बाळकृष्ण खांदे महाराज, ह.भ.प. आदिनाथ दवने, ह.भ.प. नानासाहेब शिंदे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा समन्वयक निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुरी तालुका अध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले. त्यात सदर कार्यक्रमाची रुपरेषा, संघटनेचा तालुक्यात शाखामार्फत झालेला विस्तार, दिव्यांग योजना, अंत्योदय कार्डविषयी माहीती, गोटुंबे आखाडा या ठिकाणी लवकरच दिव्यांग भवन होणार आहेत असे सांगितले.
या कार्यक्रमात दादासाहेब मोरे, ह.भ.प.खांदे महाराज, अध्यक्ष पाचारणे आदींचे मार्गदर्शनपर भाषण झाले. दुशींग महाराज यांनी आपल्या भाषणात सांगिलले की, दिव्यांगांच्या सहवासात आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्यासारखे वाटते. दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. तसेच मान्यवरांचे हस्ते पद नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले. राहुरी तालुका महिला अध्यक्षा सौ.छायाताई हारदे, नानासाहेब शिंदे तालुका समन्वयक पदी, सुरेश दानवे टाकळीमिया अध्यक्ष, प्रदीप कड टाकळीमिया उपाध्यक्ष आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
या कार्यक्रमास प्रहार सैनिक आप्पासाहेब ढोकणे, तालुका सल्लगार सलीमभाई शेख, सुरेश दानवे, तालुका सचिव योगेश लबडे, ब्राम्हणी शाखा अध्यक्ष बाबुराव शिंदे, सरपंच तुकाराम बाचकर, शशिकांत कुर्हे, दादासाहेब मोरे, संजय देवरे, दत्ता खेमनर, छायाताई हारदे, अनामिका हरेल, शिवाजी जाधव, रवींद्र दिवे, अल्ताफ शेख, मुसळे, इरोळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुरी तालुका सपंर्क प्रमुख रवींद्र भुजाडी यांनी केले.

Related Articles

Back to top button