अहमदनगर

पिंपळाचा मळा येथे दिवंगत मित्राच्या वाढदिवसाला अनोखा उपक्रम

राहुरी : सोनईच्या सहा मित्रांनी एकत्रित येत आपल्या दिवंगत मित्राच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नूतन मराठी शाळा नंबर 8, पिंपळाचा मळा या शाळेतील मुलांना खेळण्यासाठी शाळेतील खेळणी, शालेय साहित्यासह विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
पिंपळाचा मळा येथील कै. शुभम रघुनाथ तनपुरे याचे चार महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्याचा दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी वाढदिवस असल्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त सोनईच्या मित्र परिवाराला आपण मित्राच्या स्मरणार्थ ज्ञानदानासाठी काहीतरी कार्य करण्याची कल्पना सुचली. त्यांनी राहुरी येथील शुभमच्या घराजवळ असणारी नूतन मराठी शाळा नं. 8, पिंपळाचा मळा या शाळेची निवड केली. या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शाळेतील खेळणी, घसरगुंडी, शिडी, एक फॅन, शालेय साहित्य व मुलांना खाऊचे वाटप केले.
सोनईच्या या मित्रपरिवारात वैभव खराडे, संकेत बढे, आकाश साळवे, आशुतोष चौधरी, ऋतिक जंगले, योगेश हरिचंद्रे आदींचा समावेश होता. या मित्रपरिवारासह शुभमचे दाजी स्वप्निल खर्डे आदींनी या सर्व वस्तू शाळेत पोहच केल्या. शुभम ला लहान मुलांची खूप आवड होती. त्यामुळे त्याच्या आठवणींना नेहमीच उजाळा मेळावा या संकल्पनेतून घडलेल्या सामाजिक उपक्रमामुळे सोनईच्या मित्रांचे कौतुक होत आहे.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका हरळ मॅडम, राठोड सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेंद्र तनपुरे, योगेश कटारे, महेश तनपुरे, सत्यम तनपुरे, गोरख तनपुरे, बाळासाहेब तनपुरे, संतोष तनपुरे, कुणाल तनपुरे आदींची उपस्थिती होती. खेळणी बघून शाळेतील मुलं आनंदाने कुतूहलाने पाहत होते.

Related Articles

Back to top button