औरंगाबाद

पिंपळवाडीच्या ग्रामसेवकाचा मनमानी कारभार

महिला संगणक परिचारीकेला मुद्दामहून ञास

◾ संगणक परीचालक संघटनेचे गटविकास अधिकारी यांना निवेदन

विलास लाटे /पैठण : ग्रामपंचायत पिंपळवाडी पिराची येथे संगणक परिचालक म्हणुन कल्पना कैलास भुसारे या काम करत आहेत. माञ येथील ग्रामसेवक बाळकृष्ण गव्हाणे हे सतत त्या महिला कर्मचारीचा छळ करत असल्याची तक्रार पैठण पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी यांना (दि.२७) ऑक्टोबर रोजी पैठण तालुका महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने निवेदन देऊन केली आहे.

यामध्ये जास्तवेळ कामावर थांबुन धरणे, क्लार्कचे काम संगणक परिचालक यांच्याकडुन करूण घेणे, काहीही काम नसतांनाही ग्रामपंचायतीत थांबवुन ठेवणे, त्यांच्या लक्षातही येत नाही की आपण ज्या व्यक्तीला थांबवले आहे ति व्यक्ती एक महिला आहे. सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यालयात बोलवुन बसुन ठेवणे, प्रत्येक कामात काहिना काही चुक काढुन विनाकारण छळ करणे, अशा अनेक कारणाने तिथे असलेल्या परिचालक कल्पना भुसारे यांचा माणसिक छळ केला जात आहे. त्यांच्या या अशा प्रकारच्या अश्लिल कृत्यामुळे त्या महिलेची माणसिक स्थिती ढासाळली असुन कुटुंबात वाद निर्माण होत आहेत. पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी निवेदनाची दखल घेऊन त्या मुजोर ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करावी नसता वरिल ग्रामसेवकाची तक्रार राज्य महिला आयोगाकडे करणार असल्याचा इशारा पैठण तालुका संगणक परिचालक संघटनेने दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या निवेदनावर संघटनेचे पैठण तालुकाध्यक्ष संदिप हुड, उपाध्यक्ष योगेश इंदापुरे, सचिव रामेश्वर थोरे, कल्पना भुसारे यांच्यासह आदी संगणक परिचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button