महाराष्ट्र

परदेशातुन साधला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी संवाद

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे )भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासुन ग्रामीण भागाला केंद्रबिंदू मानून तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करीत आहे. मातीशी नाळ जोडलेला तसेच जगाचा खरा पोशिंदा हा देशाचा बळीराजा आहे. परंतु आज शेतकरी बाधवांच्या अनेक समस्या आहे. असे संस्थेचे अध्यक्ष कैलास पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या अनुषंगाने भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेने थेट जर्मनी या देशातील अनेक तज्ञांबरोबर महाराष्ट्रातील मराठवाडा येथील कोरडवाहू शेतीसंबंधी येणाऱ्या अडचणी, समस्या याबाबत ऑनलाइन वेबिनार आयोजित केले होते. या वेबीनार मध्ये प्रामुख्याने मराठवाडा येथून नारायणराव देवराम वराडे, दिनकरराव मगर व राहुल पवार इत्यादी शेतकऱ्यांनी चर्चासत्रात सहभाग घेत विविध समस्या मांडल्या. या चर्चासत्रात प्रामुख्याने कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत यावर अभ्यास करत संशोधन केले जाईल आणी पुढे भुमी फाऊंडेशनच्या माध्यमातुन जमेल त्या स्वरूपात शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे जर्मनी या देशातून सहभागी झालेले हर्षद बाविस्कर, डॉ.निबाळकर यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कैलास पवार तसेच इतर शेतकरी वर्ग देखिल सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button