अहमदनगर

नागवडे सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना मिळणार 12 टक्के वेतन वाढ

साखर कामगारांची दिवाळी होणार गोड, संचालक मंडळ व युनियन पदाधिकारींच्या संयुक्त बैठकित एकमताने निर्णय
अहमदनगर प्रतिनिधी : सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना (ता. श्रीगोंदा) संचालक मंडळाच्या बैठकित कामगारांना 12 टक्के वेतन वाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी (दि.22 ऑक्टोबर) पार पडली. या बैठकीत युनियन पदाधिकारी यांना देखील पाचारण करण्यात आले होते. राज्यपातळीवर 12 टक्के वेतन वाढीचा निर्णय झाला असताना, साखर कामगारांना ही वेतनवाढ ऑक्टोबर 2021 च्या वेतनात देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती श्रीगोंदा तालुका साखर कामगार युनियनचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी दिली.
या बैठकीसाठी साखर कारखान्याचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचे सदस्य राजेंद्रदादा नागवडे, व्हाईस चेअरमन युवराज चितळकर, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, युनियनचे अध्यक्ष बापुराव नागवडे, सरचिटणिस कॉ.आनंदराव वायकर, किसन कोल्हाटकर, धनंजय घाडगे, एच.ए. भुजबळ, आर.एच. कैतके, आर.एम. लबडे, एस.आर. मेहेत्रे, बाळकृष्ण जाधव, एन.बी. जाधव, एस.जी. धालवडे, ऐ.पी. गुणवरे आदी उपस्थित होते.
12 टक्के वेतनवाढ कराराची अंमलबजावणी ऑक्टोंबर 2021 पासून करण्याचा कामगार हिताचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याने स्व. शिवाजीबापू नागवडे यांचे विचार व वारसा संचालक मंडळाने पुढे सुरु ठेवल्याने कॉ. वायकर यांनी सर्वांचे आभार मानले. तर या निर्णयाने साखर कारखान्याच्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कामगारांची दिवाळी गोड होणार असल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button