शिक्षणवारी ज्ञान पंढरी

नवे शैक्षणिक धोरण-2020 भारताला ज्ञानाची जागतिक महासत्ता बनवेल – केंद्रीय शिक्षण मंत्री

धर्मेंद्र प्रधान यांनी एनसीईआरटीच्या 61 व्या स्थापना दिनाला दूरदृश्य प्रणालीद्वारे केले संबोधित

नवी दिल्‍ली : नवीन शिक्षण धोरण -2020 भारताला ज्ञानाची जागतिक महासत्ता घडवेल, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. एनसीईआरटी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या 61 व्या स्थापना दिनाला त्यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे संबोधित केले. शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार आणि डॉ.राजकुमार रंजन सिंह तसेच मंत्रालय आणि एनसीईआरटीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रधान यांनी यावेळी एनसीईआरटीचे अभिनंदन केले आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी एनसीईआरटीच्या प्रयत्नांचे कौतुक केले. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणण्यापासून ते महामारीच्या काळात अध्ययन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर आणण्यासारखे एनसीईआरटीच्याप्रवासातील मैलाचे टप्पे त्यांनी अधोरेखित केले. शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार मोठे परिवर्तन घडवून आणण्यासाठी एनसीईआरटीने वेगाने काम करायला हवे असे त्यांनी सांगितले.  
एक सर्वोच्च राष्ट्रीय संस्था म्हणून, परिषद शालेय शिक्षणात उत्कृष्टता, समता, सर्वसमावेशकता आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. एनसीईआरटी प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे संशोधन,अभ्यासक्रम, अभ्यासक्रम विकसित करणे , पाठ्यपुस्तक आणि प्रशिक्षण साहित्य या क्षेत्रांवर काम करत आहे. अलीकडील महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये राष्ट्रीय कामगिरी सर्वेक्षण (NAS) द्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन समाविष्ट आहे. अध्ययन परिणामांचा विकास, शालेय शिक्षणाच्या सर्व टप्प्यांसाठी सर्व विषय क्षेत्रात ई-सामग्री तयार करणे यांच्या समावेशासोबतच ईसीसीई अभ्यासक्रम आणि मार्गदर्शक तत्त्वे विकसित करणे, हा यशाचा आणखी एक मैलाचा टप्पा आहे.
 

Related Articles

Back to top button