साहित्य व संस्कृती

धाव पाव विठ्ठला…

विठ्ठला खरोखरच तू झोपला आहेस की,
आम्हा शेतकऱ्यावर कोपला आहेस…
बापाने माझ्या शेतात जेव्हा फाशी घेतली होती,
मरताना त्याने तुझी माळ हातात जपली होती…
चहूबाजूंनी शेतकऱ्यावर संकट कोसळत आहे,
सांग तू शेतकऱ्याकडून की पुढाऱ्यांकडून आहे…
तुझा माझा वाद युगे अठ्ठावीस सुरू आहे,
तरी तुझी पिढ्यानपिढ्या सेवा सुरू आहे…
विठ्ठला तुला झोप तरी कशी रे लागते,
अन्नदात्याचीच पोर सरकारकडे भिक मागते…
सुशांत मेला, आर्यन म्हणे आत गेला,
ह्या पुढाऱ्यांनी अकांत बघ किती रे केला…
साधी पेपरात बातमी, ना फोटो रे आला,
जेव्हा माझा गरीब बाप फाशी घेऊन मेला…
_अशोकराव नांदे पाटील

Related Articles

Back to top button