अहमदनगर

देवळालीकर डॉ. विशाखाच्या पाठीशी खंबीर, प्रसार माध्यमांचीही भूमिका महत्वाची – दत्ता पा. कडू

राहुरी / बाळकृष्ण भोसले : काल देवळालीकरांनी आपल्या डॅाक्टर कन्येवर झालेल्या अन्यायाबद्द्ल खुप जोरदार आवाज उठवत तिला पाठिंबा दिला. वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांनीहि तिची बाजु जोरकस मांडली. शासन दरबारीहि तीची कैफियत पोहचली. सर्व कायदेशीर बाबी विचारात घेवुनच तिला न्याय मिळणार आहे. आज तिच्या जामीनावर सुनावणी झाली. मा. न्यायालय उद्या त्यावर निर्णय देणार आहे. आशा करु या कि तिचे कुटुंबाचे या लढाईत धीराने घेतलेल्या परिश्रमांला यश येवुन ती पहिला टप्पा पार करेल. आम्हां देवळालकरांच्या तिच्या व तिच्या कुटुंबीयांसोबत सदिच्छा अन् पाठींब्याच्या भावना असल्याची प्रतिक्रिया देवळाली प्रवरा हेल्प टिमचे अध्यक्ष दत्ता पा. कडू यांनी दिली.
ग्रामीण भागात मुलींना उच्चशिक्षीत करत तिला तिच्या पायावर उभे करुन तिला अनुरुप वर पाहुन तिचा सुखाचा संसार पहाण्याचे सर्वाचे स्वप्न असते. व्यावसायिक शिक्षणात वैद्यकीय पदवी हि तशी सर्वोच्च मानली जाते. त्यासाठी मिळवावे लागणारे गुण व नैपुण्य ह्या गोष्टी पार पडत असताना वैद्यकीय शिक्षण पुर्ण केलेल्या या युवतींला तिच्या अभ्यासक्रमात नसलेली हि अवघड अन् कठोर प्रश्नपत्रिका सोडविण्याची वेळ आली आहे. काहीशी नाउमेद व निराश करणारी हि घटना असली तरी यातुन तावुनसुलाखुन निघत ती आपले वैद्यकीय करियर नक्की पुर्ण करेल.
डॅा विशाखा यातुन सहीसलामत बाहेर पडणे गावातील डॅाक्टर होण्याचे स्वप्ने पहाणा-या मुलींसाठी खुप महत्वाचे ठरणार आहे. त्यांची मानसिकता असे संकट झेलण्यास नक्कीच सज्ज राहील असेही दत्ता पा. कडू क्रांतीनामाशी प्रतिक्रिया देताना म्हणाले.

Related Articles

Back to top button