कृषी

दुध पुरवठा बंद आंदोलनाला क्रांतीसेनेचा पाठिंबा

राहुरी:दुधास भाव मिळत नसल्याने १ ऑगस्ट 2020 पासून शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी पुकारलेल्या दूध पुरवठा बंद  आंदोलनाला क्रांतीसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.अशी माहिती क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी दिली.
       पाठींबा पत्रात म्हटले आहे की,अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी पुकारलेल्या दुध पुरवठा बंद आंदोलनाला अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील यांच्या सुचनेनुसार पाठींबा जाहीर केला आहे. राज्य सरकारने दुध दर वाढीबाबत २१ जुलै २०२० रोजी बैठक बोलावली आहे.या बैठकीमध्ये दुध उत्पादक शेतकरी हिताचा सकारात्मक निर्णय न झाल्यास शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी दुध बंद आंदोलन करण्यात येणार आहे,असे म्हटले आहे.या आंदोलनाला महाराष्ट्रभर अखिल भारतीय क्रांतीसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.
      या आंदोलनाला क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे,कार्याध्यक्ष संदीप ओहोळ,ज्ञानेश्वर भिंगारदे, संघटक जालिंदर शेडगे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नवनाथ ढगे, दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर,युवक जिल्हाध्यक्ष युवराज सातपुते,शब्बीर शेख, राहुरी तालुका अध्यक्ष संदीप उंडे,शेखर पवार, सचिन गागरे,श्याम कदम,भगवान जाधव,सोमनाथ वने व अहमदनगर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी पाठींबा दिला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button