ठळक बातम्या

जिल्हा परिषदेच्या लिफ्टची सेवा सुरू

व्हिडिओमान्यवरांनी लिफ्ट स्वतः चालवुन पाहिली. लिफ्ट चालू झाल्याने जिल्हा परिषद मधील पदाधिकारी, अधिकारी यांच्यामध्ये नवचैतन्याचे वातावरण.


नगर प्रतिनिधी : एक वर्षापासून बंद असलेली जिल्हा परिषदेची लिफ्ट जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील व उपाध्यक्ष प्रतापकाका शेळके यांच्यासह समित्यांचे सभापती यांच्या उपस्थितीत नारळ फोडुन लिफ्टचा श्रीगणेशा करण्यात आला. 
     अहमदनगर जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद मधील नादुरुस्त लिफ्ट अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत अखेर आज पासून सर्वांच्या सेवेसाठी सुरू झाली आहे. मान्यवरांनी लिफ्ट स्वतः चालवुन पाहिली. लिफ्ट चालू झाल्याने जिल्हा परिषद मधील पदाधिकारी, अधिकारी यांच्यामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आज अनेकांनी लिफ्टने प्रवास केला. लिफ्ट चालू झाल्यामुळे अपंग प्रहार संघटनेकडून अध्यक्ष राजश्रीताई घुले व उपाध्यक्ष प्रतापकाका शेळके यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन अभिनंदन केले असल्याची बातमी जिल्हाभर आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सुनील हिवाळे यांनीही आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आनंद व्यक्त करत अभिनंदन केले आहे.

    यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रतापकाका शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समिती सभापती सुनीलभाऊ गडाख, कृषी व बांधकाम सभापती काशिनाथ दाते सर, महिला व बालकल्याण सभापती मीराताई शेटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर साहेब, कार्यकारी अभियंता रविंद्र परदेशी साहेब, गणेश देशमुख सर, सोमनाथ तांबे साहेब आदींसह सर्व भागांचे खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button