अहमदनगर

जिजाऊंच्या लेकींच्या जल्लोषाने राहुरी दणाणली; शिस्तबद्ध शिवजयंती मिरवणूकीने फेडले राहुरीकरांच्या डोळ्याचे पारणे

राहुरी – येथील मराठा बहुउद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीकडून राहुरी तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविले.
यात शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नविपेठ, राहुरी येथे सकाळी 11 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले. दुपारी 3 वाजता लहान मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूच्या मूर्तीचे पूजन करून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. पालखी मिरवणुकीत महिलांचे जिजाऊ ढोल पथक हे मुख्य आकर्षण ठरले. या मिरवणूकित महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला.
पालखी मिरवणूकीस आनंद ऋषीजी उद्यान येथून सुरवात होवून नविपेठ, शनी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शुक्लेश्वर चौक मार्गाने नविपेठेत समाप्त करण्यात आली. या पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शुक्लेश्वर चौक मंडळाचे सचिन बोरुडे व सदस्यांनी पालखी मिरवणुकीचे स्वागत करत आरती केली.
यावेळी शिवजयंती आयोजन समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून महिला भगिनींना शिवजयंती उत्सव समितीचे सर्व अधिकार देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी महिलांचा सहभाग महत्वाचा आहे. आजच्या शिवजयंती मिरवणुकीचे नियोजन गेल्या दोन महिन्यांपासून चालू होते. राहुरी परिसरातील महिला व मुलींच्या उस्फुर्त प्रतिसादामुळे जिजाऊ ढोल पथक तयार करण्यात यश आले. या ढोल पथकाला वादन शिकविण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान देवळाली प्रवरा येथिल सदस्यांनी परिश्रम घेतले. मराठा एकीकरण समितीची शिवजयंती शिस्तबद्ध असते. त्यामुळे महिला मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महिला व मुलींमध्ये सुरक्षिततेचा एक विश्वास संपादन करण्यात मराठा एकीकरण समितीचे सदस्य यशस्वी होत आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे गेल्या सौ.निलांबरी कुंभार, सौ.वर्षा लांबे यांनी केले. पालखी मिरवणुकीचे नियोजन शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष सौ.जयश्री घाडगे, सौ.वैशाली शेळके, सौ.सुरेखा माकवणे, सौ.विद्या आरगडे, सौ.संगीता दरंदले, सौ.रिसबूड, सौ.जाणका लबडे यांनी पाहिले. यावेळी राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भोजनाचे नियोजन मधुकर घाडगे यांनी पाहिले.
शिवजयंती मिरवणूक यशस्वीतेसाठी मराठा संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे, राजेंद्र लबडे, महेंद्र शेळके, अविनाश क्षीरसागर, संदीप गाडे, कुलदीप नवले, दिनेश झावरे, विनायक बाठे, सागर पाटील, अरुण निमसे, ईश्वर गाढे, धनंजय नरवडे, बाबा भोगडे, विक्रम गाढे, रवींद्र तनपुरे, अरुण निमसे, विनीत तनपुरे, किरण डुकरे आदींसह शिवप्रेमींनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button