राजकीय

जनतेचे प्रश्न सुटले नाही तर लोकप्रतिनिधींचा कार्यक्रम होतो-चव्हाण

राहुरी शहर/अशोक मंडलिक : मी कधी स्वतःचे काम सांगत नाही. तुम्हाला पाहिजे तो मेळावा घेवू, पण निवडणूकीपुर्वी जनतेचे प्रश्न सोडवा. समाजाचे प्रश्न सुटले नाही तर अधिकारी व लोकप्रतिनिधीचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही.असे काँग्रेस मेळाव्यात सडेतोड भाषणातून लोकप्रतिनिधींना लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण आव्हान दिले आहे.
देवळाली प्रवरा येथिल सहारा मंगल कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी व काँग्रेस मेळावा आयोजित केला होता. काँग्रेस मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण हे बोलत होते. यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहु कानडे, ज्ञानदेव वाफारे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, करण ससाणे, अमृत धुमाळ, संजय पोटे, अंकुश कानडे, संभाजी कदम, उत्तमराव कडू, अन्सारभाई इनामदार, बाळासाहेब खांदे, बाळासाहेब आढाव, कृष्णा मुसमाडे, बाबासाहेब धोंडे, दासु पठारे, कुणाल पाटील, शुभम पाटील, बाळासाहेब सगळगिळे, दिपक पठारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, देवळाली प्रवरात सन 2001 मध्ये दादागिरी मोडीत काढीत काँग्रेसची सत्ता आणली होती. 2011 मध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आणली. या निवडणूकीत नविन उमेदवारांना संधी मिळणार आहे. भाजपाला जनता कंटाळली आहे. नगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात असताना मोठे काम उभे केले आहे. सत्ता सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी असावी. नेते संपले पण काँग्रेस संपले नाही. प्रत्येक नागरिकांना मोफत उपचार मिळाले पाहिजे. झोपडपट्टी वासीयांना त्यांच्या जागेवर घरकुल मिळाले पाहिजे. मी वैयक्तिक काम कधीही सांगत नसतो. नेत्यांना पाहिजे तो मेळावा घेवू पण नागरिकांचे प्रश्न निवडणूकीपुर्वी सुटले पाहिजे. प्रश्न सुटत नसतील तर अधिकारी व लोकप्रतिनिधींचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही असे दोन आमदारांच्या उपस्थित लोकप्रतिनिधी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सडेतोड इशारा चव्हाण यांनी दिला आहे.
यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी नेत्यांशी भांडले पाहीजे. भाजप सरकारने खोट बोलून काही घोटाळे जनतेला दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये राफेल, बोफर्स, कोळसा, टूजी स्पेक्ट्रम असे अनेक घोटाळे काँग्रेसने केले असल्याचे जनतेसमोर मांडले. परंतु त्यातून काही सिद्ध झाले नाही. जनतेसमोर जाताना भाजपाने सतत खोटी माहिती पसरून स्वतः किती चांगले आहे, हे दाखविण्याचे काम केले आहे. त्यातून केंद्रात सत्ता मिळविली आहे. पुरोगामी विचारांची फौज तयार केली पाहिजे तर काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील. भाजपाने कर्जमाफी दिली, मात्र ती घेण्यासाठी शेतकऱ्यांना किती त्रास झाला आणि महाविकास आघाडीने २ लाख रुपयांची कर्ज माफी दिली. एकही शेतकऱ्याला कर्जमाफी घेताना त्रास झाला नाही. महागाई वाढली असून शेतकऱ्यांमध्ये संताप तयार होत नाही. भाजप सरकार धार्मिक मुद्दे पुढे करून जनतेचे मत परिवर्तन निवडणुकीला सामोरे जात असल्याचे आ.तांबे म्हणाले. देवळाली प्रवरात सन २००१ मध्ये माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासगंगा उभी राहिली. सध्या देवळाली शहरात सध्या सत्ताधाऱ्यांकडून असमाधानकारक काम सुरू आहे. मात्र येत्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या नगरपालिका निवडणूकित काँग्रेस पक्षाला संधी भेटून पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार आहेे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आ.तांबे यांनी केले.
यावेळी आ.लहू कानडे म्हणाले की, प्रत्येक गावात काँग्रेसची शाखा स्थापन केली आहे. महात्मा फुले म्हणाले होते की, शोषणाचे मूळ व शेतकऱ्यांच्या दुःखातील शेठ व सावकारांत रुतले आहे. या लोकांनी भावनेत गुंतून ठेवले आहे. भाजपची वृत्ती शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. राहातकर या लेखनाने भाजपची प्रतिमा समोर मांडताना सांगितले आहे की, झुटोने झुटोसे कहा…सच बोलो त्याचप्रमाणे भाजप वागत आहे. समाजात भेदभाव निर्माण करणारे सर्वाधिक नागपूरची माणसं आहेत. भाजपला सत्ता मिळवायची आहे. मात्र शेतकऱ्याचा मुख्यमंत्री करायचा नाही. आजही २५ टक्के जनता काँग्रेसला डोळे झाकून मतदार करणारी आहे. जनतेशी काँग्रेसने संपर्क ठेवला पाहिजे. सत्ता मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या जमिनी कारखानदारांच्या घशात घालायच्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे करण्यात आले आहेत. राहुरी तालुक्यातील ३२ गावांतील कामगार तलाठी कार्यालयासाठी ११ कोटी रुपये रुपये मंजूर करण्यात असल्याचे आ.कानडे म्हणाले. सूत्रसंचालन राजेश मंचरे यांनी केले तर आभार कृष्णा मुसमाडे यांनी मानले.
काँग्रेस घराघरात पोहोचवा आणि १ कोटी निधी मिळवा; आ.कानडे 
देवळाली प्रवरा येथील काँग्रेस सभासद नोंदणी मेळाव्यात आ.लहू कानडे यांनी आपल्या भाषणादरम्यान नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागातील घराघरात काँग्रेस पोहचवा. माणसे जोडा. प्रत्येक प्रभागाच्या समस्यां सोडवण्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी देण्याचे जाहीर केले आहे.

Related Articles

Back to top button